आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) झाली. त्यानंतर रविवारी (२७ मार्च) या हंगामातील पहिला डबल हेडर खेळला जाईल. रविवारी दुपारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात, तर सायंकाळी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा सामना पार पडेल. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन मागच्या हंगामात काही खास राहिले नव्हते. मागच्या हंगामात मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नव्हता. आगामी हंगामात मात्र संघ चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच दिल्ली कॅपिटल्सही प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात असेल.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा विचार केला, तर यामध्ये सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन खेळपट्टीवर येतील. जार हे दोन्ही सलामीवीर फॉर्ममध्ये असले, तर जगातील कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाची धुलाई करू शकतात. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना या दोघांपासून सावध राहावे लागणार आहे. मुंबईचा महत्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात उपस्थित नसेल. तो नुकताच एनसीएमधून रिहॅबिलिटेशननंतर संघामध्ये दाखल आहे. त्याच्या जागी फॅबियन ऍलनला संघात घेतले गेले आहे.
मुंबई इंडियन्साचा मध्यक्रम आणि खालच्या फळीवर खास लक्ष द्यावे लागेल, ज्यामध्ये फक्त कायरन पोलार्ड अनुभवी खेळाडूच्या रूपात उपस्थित आहे. या विभागात तिलक वर्मा, टिम डेविड आणि दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यांच्यापैकी कोणताला संधी मिळेल हे पाहावे लागेल. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळेल, तसेच जयदेव उनादकडही ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रभावी गोलंदाजी करू शकतो. मुंबईकडे मयंक मार्कंडे आणि मुरुगन अश्विनच्या रूपात प्रभावी फिरकी गोलंदाजही आहेत.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करू शकतात. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर अद्याप संघासोबत सहभागी झालेला नसल्यामुळे ही जोडी सलामीसाठी मैदानात दिसण्याची शक्यता आहे. रिषभ पंतला चांगले प्रदर्शन करून इतरांसाठी आदर्श ठेवावा लागेल.
वेस्ट इंडीजचा फलंदाज रोवमन पॉवेल, सरफराज खान आणि १९ वर्षाखालील विश्वचषक विजता कर्णधार यश धूल यांच्यावर मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करण्याची जबाबदारी असेल. अष्टपैलू शार्दुल ठाकुर आणि अक्षर पटेल फिनिशरच्या भूमिकेत असतील.
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर फिरकी गोलंदाजीची विभाग सांभाळण्याची जबाबदारी असेल. वेगवान गोलंदाजी आक्रमणाची कमान दक्षिण अफ्रिकेच्या एन्रिच नॉर्किया याच्या हातत असेल आणि मुस्तफिजूर रहमान त्याची साथ देईल. त्याव्यतिरिक्त युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
संभावित प्लेइंग इलेव्हन्स –
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, डॅनियन सॅम्स/डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, कायरन पोलार्ड, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे.
दिल्ली कॅपिटल्स –
पृथ्वी शॉ, टिम सिफर्ट, यश धूल, मंदीप सिंग, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकरिया
महत्वाच्या बातम्या –
विराटने ६ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ
धमाकेदार खेळीनंतर सोशल मीडियावर धोनी भाऊचीच चर्चा! चाहते आनंदात
आया है राजा..! ‘थाला’च्या एन्ट्रीवेळी चाहत्यांनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले, Video तुफान व्हायरल