---Advertisement---

MI आणि RCB आज येणार आमने सामने, कुठे व केव्हा होणार पहिला आयपीएल सामना; जाणून घ्या सर्वकाही

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 8:22 AM
---Advertisement---

अखेर तो दिवस उजाडला आहे. बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने आज (०९ एप्रिल) शुभारंभ होणार आहे. एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा पहिला आयपीएल सामना अतिशय रोमांचक ठरणार आहे. गतविजेता मुंबई संघ सलामीची लढत जिंकत हंगामाची दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे जेतेपदासाठी आसुसलेला बेंगलोर संघही पहिल्याच सामन्यात विरोधकांना पराभूत करण्यासाठी झगडताना दिसेल.

मुंबईकडे अनुभवी आणि धाकड खेळाडूंचा भरणा
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईचा संघ अतिशय तगडा दिसून येत आहे. आयपीएल २०२१ लिलावापुर्वी त्यांनी संघातील अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना रिटेन केले होते. यामुळे वरच्या फळीत त्यांच्याकडे क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा यांची मजबूत सलामी जोडी दिसून येईल. युवा शिलेदार सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या प्रदर्शनावरही सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील. तसेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या खालच्या फळीत दमखम दाखवताना दिसतील.

याबरोबरच धाकड फलंदाज ख्रिस लिनच्या येण्याने मुंबई संघ अजून जास्त मजबूत बनला आहे. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांच्यासारखे विश्वस्तरीय वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. तसेच अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाच्या सहभागामुळेही संघाला चांगलाच फायदा होणार आहे.

बेंगलोरसुद्धा आहे रॉयल संघ
मुंबईप्रमाणे बेंगलोर संघही यंदा खतरनाक असल्याचे दिसून येत आहे. देवदत्त पड्डीकल आणि विराट कोहली यांसारखे सलामीवीर संघाकडे उपलब्ध आहेत. एबी डिविलियर्सच्या जोडीला ग्लेन मॅक्सवेल हा विस्फोटक फलंदाज आला आहे. नवा शिलेदार फिन ऍलेन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याव्यतिरिक्त रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन यांच्या रुपात दमदार युवा फलंदाज संघाकडे आहेत.

तसेच कायल जेमिसन, क्रिस्टियन असा अष्टपैलू खेळाडूंचा संघात भरणा आहे. गोलंदाजी विभागात केन रिचर्डसन, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, ऍडम झम्पा यांसारखे टी२० स्पेशलिस्ट उपलब्ध आहेत.

कधी, कुठे आणि केव्हा होणार मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना

१. मुंबई विरुद्ध बेंगलोर सामना कुठे आणि केव्हा होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२१ चा पहिला सामना शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) चेन्नई येथील एमए चिंदबरम स्टेडियमवर होणार आहे.

२. मुंबई विरुद्ध बेंगलोर सामना किती वाजता सुरू होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजे ७ वाजता नाणेफेक होईल.

३. मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहता येणार? 
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील पहिला आयपीएल सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाता येईल.

४. मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन डिज्नी+हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकरांची खैर नाही! आरसीबीच्या मोठ्या गोलंदाजाने हार्दिक आणि पोलार्डला बाद करण्याची बनवलीय योजना

संपूर्ण यादी : सुरु होणार आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार; त्यापूर्वी जाणून घ्या सर्व संघांचे खेळाडू

युजवेंद्र चहल बनला अंडरटेकर; ६ फुट ८ इंच उंची असलेल्या खेळाडूबरोबर बनवला भन्नाट व्हिडिओ, एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---