दुबई। आयपीएलमध्ये रविवारी (4 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जाईल. पहिला सामना शहाजाह क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी 3.30 वाजता सुरु होईल तर दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रात्री 7.30 वाजता सुरु होईल.
हैदराबाद आणि मुंबई यांचे गुणतालिकेत प्रत्येकी चार गुण आहेत. या दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु नेट रनरेटनुसार मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे तर हैदराबाद चौथ्या स्थानी आहे.
चेन्नई आणि पंजाब या संघांनीही या हंगामात 4 सामने खेळले आहेत. या दोन्ही संघांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत चेन्नई आठव्या स्थानावर आहे तर पंजाब सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
त्याचबरोबर आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात फलंदाजांचे मोठे वर्चस्व राहू शकते. कारण हा सामना शारजाहच्या छोट्या मैदानात होत आहे. आत्तापर्यंत या मैदानात झालेल्या 3 आयपीएल सामन्यात सर्व संघांनी 200 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांपुढे फलंदाजांची फटकेबाजी रोखण्याचे आव्हान असेल.
तर आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि चेन्नई हे दोन्ही संघ विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.
या दोन्ही सामन्यांचे सामन्याचे थेट प्रसारण स्टार नेटवर्कवर होईल तर हॉटस्टारवर ऑनलाईन सामना पाहता येईल.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ –
मुंबई इंडियन्स –
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन(यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, मिशेल मॅकक्लेनाघन, ख्रिस लिन, जयंत यादव, अनमोलप्रीतसिंग, अनुकुल रॉय, मोहसिन खान, शेर्फेन रुदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय, नॅथन कूल्टर-नाईल
सनरायझर्स हैदराबाद –
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, के खलील अहमद, टी नटराजन, संदीप शर्मा, वृध्दिमान साहा(यष्टीरक्षक), श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, जेसन होल्डर, बावनका संदीप, बिली स्टॅनलेक, फॅबियन ऍलन, विराट सिंग, बासिल थंपी, संजय यादव
चेन्नई सुपर किंग्स –
फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, पियुष चावला, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मुरली विजय, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, इम्रान ताहिर , लुंगी एन्गिडी, मोनू कुमार, मिशेल सँटनर, रविश्रीनिवासन साई किशोर, एन जगदीसन, ऋतूराज गायकवाड, केएम आसिफ
किंग्स इलेव्हन पंजाब –
केएल राहुल (यष्टीरक्षक/ कर्णधार), मयंक अगरवाल, करुण नायर, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, सरफराज खान, कृष्णाप्पा गॉथम, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल, दीपक हूडा, हार्दस विल्जोइन, जगदेश सुचित, ईशान पोरेल, मुजीब उर रहमान, ताजिंदर सिंग, दर्शन नलकंडे, अर्शदीप सिंग, सिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन, ख्रिस जॉर्डन, मनदीप सिंग, ख्रिस गेल