मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद जिंकून देणारा कर्णधार आणि भारतीय वनडे-टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याचा आज (३० एप्रिल) वाढदिवस आहे. तो आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने कोट्यावधी चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाच्या कुटुंबातर्फे देखील त्याला अप्रतिम असा ग्राफिक्स शेअर करत शुभेच्छा देण्यात आल्या आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघासाठी त्याने गेल्या काही वर्षांपासून महत्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला हिटमॅन नावाने ओळखले जाते. त्याचे कारणही तितकेच खास आहे. पुल शॉटचा बादशाह रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३ दुहेरी शतक झळकावले आहेत. असा कारनामा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
सध्या तो आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अप्रतिम ग्राफिक्स शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “जेव्हाही आणि जिथेही तो चालतो, त्या मंचावर आग लावून टाकतो. नाव आहे रो-हिट शर्मा. वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्णधार.”
👊🏻🔥 Setting the stage on fire whenever and wherever he walks in – the name is Ro-HIT Sharma 😎
Happy Birthday, Captain 💙#OneFamily #MumbaiIndians #HappyBirthdayRohit #HitmanDay @ImRo45 pic.twitter.com/ALOmyZ6NnE
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2021
धोनीने पालटले रोहित शर्माचे नशीब
रोहित शर्माने जेव्हा सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा तो संघात मध्यक्रमात फलंदाजी करायचा. परंतु त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश येत होते. तसेच निराशाजनक कामगिरीमुळे त्याला संघात स्थान मिळत नव्हते. परंतु कर्णधार एमएस धोनीने त्याला सलामी फलंदाजी करण्याची संधी दिली आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने दोन अर्धशतक झळकावले होते. तर त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत २०९ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच शिखर धवन सोबत मिळवून त्याने भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिले आहेत.
रोहित शर्माची कारकीर्द
रोहित शर्माने भारतीय संघामध्ये सलामी फलंदाजाची भूमिका स्वीकारल्यापासून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने आतापर्यंत एकूण २२७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ४९ च्या सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत. यात ४३ अर्धशतक तर २९ शतकांचा समावेश आहे.
तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १११ सामने खेळले आहेत. यात त्याने ३२.५ च्या सरासरीने २८६४ धावा केल्या आहेत. यात २२ अर्धशतक आणि ४ शतकांचा समावेश आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने आपला ठसा उमटवला आहे. त्याने आतापर्यंत ३८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४६.७ च्या सरासरीने २६१५ धावा केल्या आहेत. यात ७ शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आज कोट्यावधींचा मालक असलेल्या रोहितकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, ‘अशी’ भागवायचा गरज
इशानला बाकावर बसवल्याने सार्वकालिन महान फलंदाज नाराज; म्हणाले, “मी असतो तर एक संधी दिली असती”
वनडेत पदार्पण केल्यावरही रोहितसाठी ही ६ वर्ष ठरली अतिशय खराब