पुणे: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई खिलाडीज संघाने आपले गुणांचे खाते उघडले. रंगतदार झालेल्या लढतीत मुंबई खिलाडीज संघाने राजस्थान वॉरियर्स ५१-४३ असा आठ गुणांनी पराभव केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या विजयाची नोंद केली असली तरी, त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. मुंबईच्या विजयात त्यांच्या बचावपटूंची कामगिरी निर्णायक ठरली. त्याचबरोबर आज मुंबईच्या गजानन सेनगल याचे आक्रमण निर्णायक ठरले. त्याने पोलवरती अचूक कामगिरी करताना १६ गुणांची कमाई केली. यानंतरही कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे आणि यांचा बचाव निर्णायक ठरला. विश्रांतीला त्यांनी मुंबई संघाने मिळवलेली २९ अशी ९ गुणांची आघाडी निर्णायक ठरली. विश्रांतीनंतर राजस्थान संघाने आपल्या आक्रमणात २१ गुणांची कमाई करत ४१-३३ अशी आघाडी घेतली. यावेळी मुंबईला बचावाचे चार गुण मिळाले. अखेरच्या सात मिनिटांत मुंबई संघाने १८ गुणांची कमाई करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
आज ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित अल्टीमेट खो खोच्या दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपच्या ब्रास बँडद्वारे राष्ट्रगीत वाजवुन आजचा दिवस साजरा करण्यात आला. या स्वदेशी खेळाप्रमाणेच, बॉम्बे अभियांत्रिकी समूहाचाही, 300 वर्षांपूर्वीच्या स्थापनेपासूनचा एक मोठा आणि विशिष्ट इतिहास आहे. युद्ध आणि शांततेच्या काळात याने देशाची सेवा केली आहे, पुरस्कार मिळवले आहेत आणि निःस्वार्थ बलिदानाबद्दल देशाची कृतज्ञता आणि मान्यता आहे.
काल दुसऱ्या सामन्यात तेलगु योद्धाज संघाने चेन्नई क्विक गन्स संघाचा ४८-३८ अशा फरकाने पराभव करत शानदार सुरुवात केली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून ते 4 सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगणार असून यामध्ये सहा फ्रॅंचायझीचे संघ विजेतेपदासाठी झुंजनार आहेत. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यावरून या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहेत.
दुसरा सामना चेन्नई क्विक गन्स विरुद्ध ओडिशा जुगरनट्स यांच्यात उशिरा होणार आहे. मुंबई खिलाडीजच्या श्रीजेश एस याला बेस्ट डिफेंडरचा ‘किताब, तर प्लेअर ऑफ द पुरस्कार विजय हजारे याने पटकावला. राजस्थान वॉरियर्सच्या मझहर जमादारने बेस्ट अटॅकर ‘किताब पटकावला. आज(मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी) तेलगु योद्धाज विरुद्ध राजस्थान वॉरियर्स यांच्यात पहिला सामना, तर गुजरात जायंट्स विरुद्ध ओडिशा जुगरनट्स यांच्यात दुसरा सामना होणार आहे.
या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
स्वातंत्र्यदिनी कॅप्टन रोहितकडून नकळत झाली ‘ही’ भलीमोठी चूक, चाहत्यांनी केले चांगलेच ट्रोल
Breaking : विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा ‘हा’ दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर