भारताचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी (24 आॅक्टोबर) विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 157 धावांची नाबाद दिडशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने वनडेमध्ये 10 हजार धावांचा टप्पाही पार केला आहे.
त्याने 10 हजार धावांचा टप्पा फक्त 205 डावांमध्ये पूर्ण केल्याने तो हा टप्पा सर्वात जलदगतीने गाठणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांनी अनोख्या पद्धतीने त्याचे कौतुक केले आहे.
हे कौतुक त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी विराटचे कौतुक करताना म्हटले आहे की ‘आम्ही विराटकडून अोव्हर – स्पिडींग चलन (अतिवेगवान गाडी चालवण्याबद्दल आकारण्यात येणारा दंड) घेणार नाही. आम्ही फक्त त्याचे कौतुक करु आणि आणखी धावा करण्यासाठी त्याला शुभेच्छा’
https://twitter.com/MumbaiPolice/status/1055069480299184135
विराटने 9 हजार ते 10 हजार दरम्यानचा टप्पा फक्त 11 डावांमध्ये पूर्ण केला आहे. विराट 10 हजार धावा करणारा 5 वा भारतीय तर एकूण 13 वा क्रिकेटपटू ठरला आहे.
मुंबई पोलिसांनी अनेकदा असे मजेदार ट्विट करत ट्रॅफिकचे नियम नागरिकांना समजावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम
–मुंबई संघाला मोठा धक्का; पृथ्वी शॉ दुखापतीने जायबंदी
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ड्वेन ब्रावोबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?
–आयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले