मुंबई | बांद्रा कुर्ला क्रीडा संकुलात होणाऱ्या सराव शिबीरासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने याआधी निवडलेल्या २७ खेळाडूंमध्ये आणखी ७ सात खेळाडूंची निवड केली आहे.
यामध्ये शुभम रांजने, शशांक सिंग, अकिंत सोनी, अल्पेश रमजानी, प्ररिक्षीत वळसंगकर, प्रसाद पवार आणि अदित्य धुमाळ यांचा समावेश आहे.
या खेळाडूंनी गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करुनही सराव शिबीरासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने डावलले होते.
याप्रकरणामुळे पारसी क्रिकेट अकादमीचे खोदाद येझगर्दी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवड समितीवर जोरदार टीका केली होती.
त्यानंतर आता भारताचे माजी कर्णधार मुंबईकर दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या निवड समितीवर टीका करत, निवड समिती मुंबईच्या खेळाडूंच्या कारकिर्दीसोबत खेळत असल्याचा आरोप केला आहे.
“सराव शिबीरातील खेळाडूंसोबत जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. असला प्रकार मुंबई क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडला नाही. त्यामुळे निवड समितीकडून होणारे असल्या प्रकारामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीचे नुकसान होऊ शकते.” असे दिलीप वेंगसरकर म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना
–अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण