मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात आज शेवटचा सामना रंगला. दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले होते. मुंबई उपनगर संघांने पहिल्याच 5 मिनिटात रायगड संघावर लोन पडत 10-1 अशी आघाडी मिळवली.
मुंबई उपनगरच्या आकाश रुडेले चतुरस्त्र चढाया करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याला भारत खारगुटकर व रुतिक कांबळी ने चांगली साथ दिली. रायगड संघाचे चढाईपटू मुंबई उपनगर संघासमोर काही टिकाव धरू शकले नाही. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे 27-7 अशी भक्कम आघाडी होती.
मुंबई उनगरने दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात करत रायगड संघावर तिसरा लोन पाडला. मुंबई उपनगरच्या चढाईपटू व बचावपटूंनी सांघिक खेळ करत सामना एकतर्फी केला. मुंबई उपनगरकडून आकाश रुडेले ने एकूण 13 गुण मिळवले तर पकडीत रुतिक कांबळीने 5 व रोहित सिंगने 4 पकडी करत महत्वाची भूमिका बजावली. मुंबई उपनगर संघाने 54-19 असा सलग तिसरा विजय मिळवला. रायगड संघाकडून सनी भगत व अनुराग सिंग ने चांगला खेळ केला.
बेस्ट रेडर- आकाश रुडेले, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
बेस्ट डिफेंडर- सनी भगत, रायगड मराठा मार्वेल्स
कबड्डी का कमाल- अनुराग सिंग, रायगड मराठा मार्वेल्स
(Mumbai Suburban Murthal Magnets third win in a row)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्करमऐवजी भुवीने उधळला टॉस, राजस्थान करणार पहिली बॅटिंग; महत्त्वाचा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन