मुंबई। मुंबई विद्यापीठ व महर्षी दयानंद महाविद्यालयात परेल, मुंबई आयोजित आंतर-झोन मुंबई विद्यापीठ कबड्डी स्पर्धा (मुले) २०१८-१९ स्पर्धा महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मैदानात ८ ऑक्टोबर व ९ ऑक्टोबर दरम्यान पार पडली. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा महर्षी दयानंद महाविद्यालयाने बाजी मारली. या स्पर्धेतला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. राष्ट्रीय खेळाडू व कबड्डी प्रशिक्षकानी स्पर्धेला भेट दिली.
मुंबई विद्यापीठाच्या पाच झोन मधून एकूण १६ संघांनी यास्पर्धेत सहभाग घेतला होता. मुंबई विभागातून ४ संघ आंतर- झोन स्पर्धेसाठी पात्र झाले होते. तर उर्वरित विभागातून १२ संघ पात्र झाले होते.
पहिल्या दिवशी आंतर-झोन कबड्डी स्पर्धेत सहभागी १६ संघांत बादफेरी पद्धतीने सामने खेळवण्यात आले. २ मैदानावर झालेल्या यास्पर्धेतुन पात्र ठरलेल्या अंतिम चार संघात साखळी पद्धतीने दुसऱ्यादिवशी सामने खेळवण्यात आले.
महर्षी दयानंद महाविद्यालय परेल, इंदिरा गांधी महाविद्यालय विक्रोळी, सेंथ गोंसालो गार्सिया महाविद्यालय वसई व ठाकूर महाविद्यालय कांदिवली हे चार संघ अंतिम साखळी पद्धतीने सामने खेळण्यास पात्र ठरले.
दुसऱ्या दिवशी चार संघात अंतिम साखळी फेरीपद्धतीने सामने खेळवण्यात आहे. इंदिरा गांधी महाविद्यालय विरुद्ध सेंथ जि घोषाल महाविद्यालय व महर्षी दयानंद महाविद्यालय विरुद्ध ठाकूर महाविद्यालय या दोन साखळी सामने झाले. इंदिरा गांधी व महर्षी दयानंद महाविद्यालयाने विजय मिळवले. त्यानंतर इंदिरा गांधी महाविद्यालय विरुद्ध ठाकूर महाविद्यालय व महर्षी दयानंद विरुद्ध सेंथ गोंसालो गार्सिया महाविद्यालय यांच्यात झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा महर्षी दयानंद व इंदिरा गांधी महाविद्यालयाने बाजी मारली.
२-२ सामन्याच्या निकालानंतर महर्षी दयानंद महाविद्यालय व इंदिरा गांधी महाविद्यालय याचे प्रत्येकी ४-४ गुणसह पहिल्या व दुसऱ्या स्थानी होते. तर दोन्ही सामने पराभूत झालेले ठाकूर व सेंथ गोंसालो गार्सिया महाविद्यालय गटात तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. त्यामुळे शेवटचे २ सामने निर्णायक होते.
सेंथ गोंसालो गार्सिया विरुद्ध ठाकूर महाविद्यालय यांच्यात झालेल्या तिसऱ्या क्रमांकच्या सामन्यात ठाकूर महाविद्यालयाने विजय मिळवला. महर्षी दयानंद महाविद्यालय विरुद्ध इंदिरा गांधी महाविद्यालय याच्या झालेल्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत महर्षी दयानंद महाविद्यालय परेल संघाने विजय मिळवत, सलग दुसऱ्यावर्षी या महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या आंतर-झोन कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद पटाकवले. शिव छत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी दयानंद महाविद्यालयाने कबड्डीत आपली ओळख निर्माण केली आहे.
स्पर्धेचा निकाल:
प्रथम क्रमांक- महर्षि दयानंद महाविद्यालय, परेल
द्वितीय क्रमांक- इंदिरा गांधी महाविद्यालय, विक्रोली
तृतीय क्रमांक- ठाकुर महाविद्यालय, कांदीवली
चतुर्थ क्रमांक-सेंथ गोंसालो गार्सिया महाविद्यालय, वसई
महत्वाच्या बातम्या-
- अफगाणिस्तानविरुद्ध वन-डेतील कॅप्टन्सी धोनीला पडली महागात
- हैद्राबादमध्ये कोहली मोडणार पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकचा विक्रम
- पृथ्वी शाॅ बद्दल केलेले ट्विट स्विग्गी आणि फ्रिचार्ज यांना पडले १ कोटीला