मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान शोएब अख्तर या गोलंदाजाने जेव्हा क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात केली, तेव्हा तो खतरनाक गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. याचसोबत आपली तंदुरुस्ती आणि आकर्षक लुकद्वारे तेव्हा त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक युवती त्याच्या प्रेमात पडू लागल्या. त्यापैकी एक होती भारताची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता.
प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मध्ये काम करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता शोएब अख्तरची खूप मोठी फॅन होती. नुकतीच तिने खुलासा केला की, ती शोएब अख्तरवर फिदा होती. टीव्ही टाइम्सच्या वृत्तानुसार, शोएब तिचा ‘क्रश’ होता. शोएब व्यतिरिक्त मुनमुनला शाहरुख खानदेखील आवडतो.
मुनमुन इन्स्टाग्रामवर बरीच प्रसिद्ध आहेत. तिचे 34 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती गेल्या काही दिवसात तिचे सुंदर छायाचित्रे शेअर करत आहे. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या विनोदी कार्यक्रमात ‘बबिता अय्यर’ ची भूमिका साकारण्यासाठी ती परिचित आहे. शोचे संपूर्ण 3000 भाग पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा शूटिंगवर आली आहे. तिने मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि त्यानंतर तिने 2004 मधील ‘हम सब बाराती’ या कार्यक्रमातून अभिनयात पदार्पण केले. कमल हसनच्या मुंबई एक्सप्रेस चित्रपटातही तिने काम केले आहे. यासोबत अक्षय कुमार यांच्या हॉलिडे या चित्रपटात तिने काम केले.
https://www.instagram.com/p/B9jCDNfhfvV/
अख्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून बेधडक विधाने करत असतो. नुकतेच त्याने ऑक्टोबरमध्ये टी 20 वर्ल्डकपच्या ठिकाणी होणार्या इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) विरोध केला होता. तो म्हणाला, “आशिया चषक नक्कीच होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरूद्ध खेळण्याची मोठी संधी मिळाली असती. याची अनेक कारणे आहेत. मला त्यात जायचे नाही. तिथे टी 20 विश्वचषक होऊ शकला असता, परंतु मी ते आधीच असे म्हटले होते की ते ते होऊ देणार नाहीत. आयपीएलचे कोणतेही नुकसान होऊ नये, विश्वचषक नरकात जाऊ द्या.”
महत्त्वाच्या बातम्या-
–आता धोनीच्या खांद्यावर दिसणार नाही झिवा, पहा काय केलाय क्रिकेटरसाठी नवा नियम
–पाकिस्तानला एकेवेळी रडवणार क्रिकेटर झाला हिरो, करतोय तामिळ चित्रपटात पोलीसाचा रोल
–रैना- धोनीमध्ये कर्णधार विराट कोहली या खेळाडूला देणार नाही टीम इंडियात संधी