भारतीय संघाचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिकने खुलासा केला आहे की, एकदा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कार्तिक आजारी असतानाही त्याला एक सामना खेळण्यासाठी मजबूर केले होते. २०१२मध्ये गांगुली हा आयपीएलच्या पुणे वॉरियर्स संघाचा कर्णधार होता आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या एका सामन्यात कार्तिकने खेळावे असे त्याची इच्छा होती. कारण, त्या सामन्यामध्ये गांगुलीला एका डावखुऱ्या फिरकीपटूची गरज होती.
म्हणून गांगुलीने कार्तिकला सीएसकेविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी सांगतिले होते. त्यावेळी १०४ डिग्री ताप असतानाही गांगुलीच्या म्हणण्यामुळे कार्तिक खेळण्यासाठी तयार झाला होता. एका क्रिडा वेबसाइटशी बोलताना कार्तिकने या गोष्टीचा उलगडा केला आहे.
कार्तिक म्हणाला की, “२०१२मध्ये दादा आयपीएलच्या पुणे वॉरियर्स संघाचे नेतृत्त्व करत होता. दरम्यान आमचा सीएसकेविरुद्ध एक सामना होणार होता. त्यावेळी मला खूप ताप असतानाही दादाने त्या सामन्यात खेळण्यास सांगितले होते. मी अपेक्षा करतो की, त्या सामन्याची फुटेज असावी. जेणेकरुन सर्वांना समजेल की, मी कशाप्रकारे पूर्ण बाह्या असलेला स्वेटर घालून खेळलो होतो. मला ताप असतानाही मी तो सामना खेळला होता.”
शिवाय, सीएसकेमधील आपल्या स्थानाबाबत बोलताना कार्तिक म्हणाला की, “जर दादा डावखुऱ्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर चांगला खेळू शकत होता. तर, मी ३ वर्षे कोलकाता नाइट रायडर्स संघामध्येच का राहिलो? त्यानंतर २०११मध्ये दादा पुणे वॉरियर्स संघात सामाविष्ट झाला आणि २०१२मध्ये संघाचा कर्णधारही बनला. त्यावेळी दादाने मला ट्रेडद्वारे सीएसकेमध्ये सामाविष्ट होऊ दिले नव्हते आणि मला आपल्या संघाचा भाग बनवले होते. म्हणून माझ्याजागी डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजाला सीएसकेमध्ये संधी मिळाली आणि तो आताही त्या संघाचा भाग आहे.”
तसेच, भारतीय संघातील आपल्या स्थानाबाबत बोलताना कार्तिक म्हणाला की, “दादाला वाटत होते की, माझ्यात माझ्या फिरकी गोलंदाजीने विरुद्ध संघातील फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता होती. म्हणून ज्या सामन्यात हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे नसतील, त्या सामन्यात दादा मला संधी देत असायचा.”
ट्रेंडिंग घडामोडी-
हरभजन म्हणतो, त्या घटनेमुळे ऑस्ट्रेलियाई मीडियाने मला मायकल जॅक्शन…
यष्टीरक्षक धोनीने इतके विक्रम केले मात्र हा विक्रम राहुनच गेला
आख्ख्या चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणाऱ्याला इरफानची मदत