इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात धुव्वादार प्रदर्शन करत भारताचा ३७ वर्षीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे. जवळपास ३ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून पुन्हा एकदा भारतीय संघात येत तो फिनिशरची भूमिका बजावत आहे. आता कार्तिकनंतर त्याचा संघ सहकारी राहिलेला भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय आता क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
३८ वर्षीय मुरली विजय (Murali Vijay) आता तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेद्वारे तो २ वर्षांनंतर प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर (Murali Vijay Comeback) उतरेल. तमिळनाडू प्रीमियर लीगचा (Tamilnadu Premiere League) सहावा हंगाम २३ ते ३१ जुलैदरम्यान खेळला जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
मुरली विजय शेवटचा आयपीएल २०२० मध्ये खेळताना दिसला होता. या हंगामात त्याने ४ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनित्त्व केले होते. यानंतर आता तो तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये रूबी त्रिची वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. २ वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी आपण तयार असल्याचे स्वत: मुरली विजयने सांगितले आहे.
तो म्हणाला की, “मी क्रिकेट खेळू इच्छित होतो. परंतु मला दुखापत झाली होती, ज्यामुळे मला मैदानावर उतरला आले नाही. तसेच माझे वैयक्तिक आयुष्यदेखील वाऱ्याच्या वेगाने पुढे जात होते, ज्याला मला संथ करायचे होते. मला पाहायचे होते की, वैयक्तिकरीत्या मी सध्या कुठे उभा आहे. याचसाठी मला ब्रेकची गरज होती. मला आनंद आहे की, तमिळनाडू क्रिकेट लीगने माझी परिस्थिती समजून घेतली आणि मला पुनरागमनासाठी मंच उपलब्ध करून दिला.”
दरम्यान मुरली विजय आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जरी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे संघ सहकारी राहिले असले. तरीही त्यांचे मैदानाबाहेरील आयुष्यातील संबंध तितके चांगले नाहीत. दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकीता वंजारा हिने मुरली विजयसोबतच्या नात्यामुळे २०१२ मध्ये दिनेश कार्तिकपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पुढे तिने मुरली विजयसोबत लग्न करून घेतले. आता त्यांना २ मुले आणि १ मुलगी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इशान की प्रियांक? विराटसोबत धावत असलेला व्यक्ती कोण? सराव सत्रातील फोटोने गोंधळले चाहते
INDvsSA | कर्णधार म्हणून कोहली, धोनीकडूनही जे नाही झाले; ते करत इतिहास रचणार रिषभ पंत
मुंबई-मध्य प्रदेशमध्ये रंगणार रणजी ट्रॉफीची फायनल, जाणून घ्या आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर