श्रीलंकेचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 12 वर्षांपूर्वी (22 जुलै 2010) शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि या दिवशी इतिहासही रचला. मुरलीधरनने 11 वर्षांपूर्वी भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना 800 बळी पूर्ण केले होते आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. हा त्याचा कारकिर्दीतील अखेरचा सामनाही होता.
मुरलीने शेवटच्या कसोटीपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये 792 विकेट्स घेतल्या होत्या आणि 800 बळीचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 8 विकेट्सची गरज होती. त्याने भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ही आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने त्या सामन्यात सचिन तेंडुलकरची पहिली विकेट घेतली. त्यानंतर पावसामुळे सामना थांबला.
सलग दोन दिवसांच्या पावसानंतर मुरली जेव्हा मैदानावर परत आला, तेव्हा त्याने भारतीय फलंदाजांना आपल्या जादुई फिरकीने सातावले. चौथ्याच दिवशी पाच विकेट घेतले. शेवटच्या दिवशी मुरलीने प्रज्ञान ओझाला बाद करत 800 बळी घेण्याचा इतिहास घडविला. त्यानंतर त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.
मुरलीधरनने 18 वर्षांच्या कारकीर्दीत 166 कसोटी सामने खेळले. त्यादरम्यान त्याने 22.7 च्या सरासरीने बळी घेतले. मुरलीधरनने सर्वात वेगवान 400,500,600 आणि 700 गडी बाद करण्याचा विक्रमही केला आहे. मुरलीने कसोटी क्रिकेटमध्ये 44039 चेंडू फेकले. तीन मैदानावर 100 पेक्षा जास्त बळी घेणारा मुरली पहिला गोलंदाज आहे. इतकेच नाही तर त्याने श्रीलंकेच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक 493 बळी घेतले आहेत. 4 कसोटींमध्ये सलग 10 पेक्षा जास्त बळी घेण्याचा विक्रमही मुरलीच्या नावावर आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुरलीधरन वनडे क्रिकेट खेळत होता. त्याने 350 वनडे सामन्यात 534 बळी घेत वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये त्याने एकूण 1347 बळी मिळवले असून यात आंतरराष्ट्रीय टी20 मधील 13 बळींचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट-गावसकरांचे 29वे कसोटी शतक वेस्ट इंडीजविरुद्धच! धावसंख्याही समान, घडला जबरदस्त योगायोग
आधी गळाभेट, चुंबन आणि नंतर अश्रू! विराटला भेटताच विंडीजच्या खेळाडूची आई लागली रडू, भावूक करणारा Video