---Advertisement---

धक्कादायक! पिंपरी चिंचवडवडमधील पैलवानाचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू, धडाधड झाडल्या ८ गोळ्या

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 6:56 PM
Wrestler Murder In Pune
---Advertisement---

पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरातून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. गुरुवारी रात्री (२३ डिसेंबर) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव (Shelpimpalgaon) येथे एका पैलवानाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Wrestler Murder) करण्यात आली आहे. भरचौकात ही घटना घडली असून यामुळे पुणे हादरले आहे. नागेश सुभाष कराळे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, हत्या झालेले पैलवान नागेश (Nagesh Subhash Karale) शेलपिंपळगावमध्ये राहत होते. गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी येथून आपल्या कारने नागेश आपल्या घरी जात होते. यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. नागेश हे आपल्या कारमध्ये बसत असतानाच शेजारी उभ्या असलेल्या फोर्ड फिगो कारमध्ये दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर ८ गोळ्या झाडण्यात (firing bullets) आल्या आहेत. हा सर्व प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

गोळीबारामध्ये त्यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याने नागेश गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ चाकण येथीले एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच पूर्वनियोजित कट रचून हा खून करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.

नागेश हे पैलवान तसेच कुस्ती प्रशिक्षक होते. ते शेलपिंपळगावमध्ये कुस्तीची तालीम चालवत असत. या परिसरात ते पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची अशाप्रकारे हत्या झाल्याचे ऐकून या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘अश्विन श्रीलंकेत जन्मला असता तर…’, आइसलंड क्रिकेटचे गमतीशीर ट्वीट सोशल मीडियावर ठरतेय चर्चेचा विषय

‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही

राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---