भारतीय संघ १ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या पार्श्वभूमीवर भारताचे कसोटी स्पेशलिस्ट फंलंदाज अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांना इंग्लड लायन्स विरुद्धच्या अनाधिकृत कसोटी सामन्यात भारतीय अ संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेत भारताची कामगिरी चांगली व्हावी या हेतूने भारतीय संघ व्यवस्थापन आणि भारतीय अ संघाच्या प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सहमतीने या दोन्ही फलंदाजांना सरावाची संधी मिळावी म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड अजुन झाली नसली तरी संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे रहाणे आणि मुरली विजय यांची कसोटी संघातील जागा नक्की झाल्याचे दिसत आहे.
यापूर्वी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि जलदगती गोलंदाज इशांत शर्माने कौंटी क्रिकेटच्या २०१८ मोसमात सहभागी झाल्याने त्यांनी इंग्लंड मधील परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारताने २-१ अशा फरकाने इंग्लंडला पराभूत केले आहे.
तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. १७ जुलैला एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास
-म्हणुन धोनी आहेत जगातील सर्वात हुशार क्रिकेटर…