भारतीय संघाला रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव स्वाकारावा लागला. भारतीय संघ एकही पराभव न स्वीकारता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला 79 धावांनी मात दिली. ऑस्ट्रेलियासाठी ही 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील चौथे विजेतेपद ठरले. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत भारताचा वेगवान गोलंदाज नमन तिवारी फलंदाजी करणाऱ्या मुरुगन अभिषेकला प्रोत्साहन देताना दिसतो.
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 दक्षिण आफ्रिकेत पार पडला. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे तुल्यबळ संघ आमने सामने होते. हा सामन्यात दोन संघात तुफान संघर्ष पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तेस काहीच झाले नाही. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी विभागात जबरदस्त प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. भारतीय संघ या सामन्यात फलंदाजी करत असताना नवव्या विकेटआधी नमन तिवारी (Naman Tiwary) आणि मुरुगन अभिषेक (Murugan Abhishek) खेळपट्टीवर होते. या दोघांमधील संवाद स्टंप्स माईकमध्ये कैद झाला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून भारताला विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाने 8 विकेट्सच्या नुकसानावर 151 धावा केल्या होत्या. सामना ऑस्ट्रेलियाने जवळपास जिंकलाच होता. पण खेळपट्टीवर उभ्या शेलल्या नमन आणि अभिषेकने धीर सोडला नाही. सामना आपल्या हातून जवळपास निसडला आहे, हे त्यांना कळत होते. पण तरीही दोन्ही खेळाडू प्रत्येक चेंडूतून काहीतरी शिकण्याच्या प्रयत्नात होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नमन तिवार मुरुगन अभिषेकला म्हणतो की, “लक्षात ठेव, आपण हरतो तरी खूपकाही शिकून जाऊ.”
Tiwari Saying to Murugan:
“Yaad rakha , haarenge par sekhh ke jayenge !!” pic.twitter.com/gn31SOakcu— 🎰 (@StanMSD) February 11, 2024
दरम्यान, उभय संगांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांमध्ये 173 धावांपर्यंत मजल मारू शकला. गोलंदाजांच्या तुलनेत भारताच्या फलंदाजांनी अंतिम सामन्यात चाहत्यांना अधिकच नाराज केले. यावर्षी भारताकडे 19 वर्षाखालील विश्वचषकात सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी होती. पण ही संधा संघ साधू शकला नाही. (Murugan Abhishek and Naman Tiwari’s discussion in the final of the U-19 World Cup goes viral)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर आकाश दीपची पहिला प्रतिक्रिया समोर; म्हणाला…
U19 IND vs AUS: अंडर 19 फायनलमध्ये कोहलीपासून ते कैफपर्यंत ‘हे’ भारतीय कर्णधार ठरले फ्लॉप; यंदाही ‘उदय’….