---Advertisement---

शॉकिंग! लाईव्ह सामन्यातच ३८ वर्षीय स्टार बॉक्सरला हृदयविकाराचा झटका, जागीच गमावले प्राण

On: गुरूवार, मे 19, 2022 8:27 PM
---Advertisement---

क्रिडाजगतातून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. तुर्कीचा स्टार बॉक्सर मूसा अस्कान यामक याला लाईव्ह सामन्यादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने रिंगमध्येच त्याचा मृत्यू झाला. तो ३८ वर्षांचा होता. शनिवारी (१५ मे) मूसा युगांडा हमजा वांडेरा विरोधात सामना खेळत असताना त्याचा अकनाक मृत्यू झाला आहे. या सामन्यातील तिसऱ्या फेरीदरम्यान त्याची शुद्ध हरपल्याने तो रिंगमध्ये पडला आणि तिथेच गतप्राण झाला. त्याच्या आकस्मिक निधनानंतर क्रिडाजगत शोकसागरात बुडाले आहे. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, मूसावर प्रतिस्पर्धी खेळाडू वांडेराने दुसऱ्या फेरीदरम्यान जोरदार वार केला होता, ज्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो धापकन खाली कोसळला. त्यानंतर त्वरित त्याच्या मदतीसाठी मेडिकल टीमने रिंगमध्ये दाव घेतली. परंतु तोपर्यंत त्याने आपला जीव गमावला होता. तरीही मूसाला जवळील स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मूसा बॉक्सिंग रिंगमध्ये अजेय होता आणि त्याची आकडेवारी ८-० अशी होती.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटवरील प्रेम म्हणा वा संघनिष्ठा! तब्येत बरी नसतानाही लखनऊसाठी खेळला एविन लुईस, ठरला गेमचेंजर

ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!

केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---