---Advertisement---

चुकीसाठी क्षमस्व! संघसहकाऱ्यावर हात उगारल्यानंतर मुशफीकूर रहीमने मागितली माफी

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 6:57 PM
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असलेला मुशफीकूर रहीम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या बेशिस्त वर्तणुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. नुकताच आपल्या संघसहकाऱ्यावर हात उगारताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. बांग्लादेशच्या बंगबंधू टी२० चषकातील एलिमिनेटर सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. पण आता रहीमला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्याने आपल्या संघसहकाऱ्याची क्षमा मागितली आहे.

अशी घडली होती घटना
ढाका बेक्सीमको विरुद्ध फॉर्च्यून बरीसाल यांच्या दरम्यान झालेल्या एलिमिनेटर सामन्याच्या दुसऱ्या डावातील १७ वे षटक प्रगतीपथावर होते. तेव्हा कर्णधार रहीम आपला साथीदार नसुम अहमदबरोबर एका झेलावरून झगडला. ही घटना घडली त्यावेळी बरीसाल संघाला विजयासाठी १९ चेंडूत ४५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे पाच गडी देखील शिल्लक होते. बरीसाल संघाचा आफिफ हुसेन त्याक्षणी चांगल्या लयीत खेळत होता.
षटकातील अखेरच्या चेंडूवर डावखुऱ्या हुसेनने चौकार खेचून घेण्याच्या इराद्याने फाईन लेगला चेंडू मारला. त्याचवेळी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अहमद ३० यार्डच्या आत असल्याने लेग स्लीपजवळ उभा होता. चेंडू वर उडाल्याने दोन्ही खेळाडू झेल घेण्यासाठी धावले. रहिमने आवाज देत तो झेल पकडणार असल्याचे सांगितले. तरीही नसुम जवळ आला. रहीमने तो झेल पूर्ण केला. मात्र त्यानंतर तो नसुमवर जाम संतापला. झेल घेतल्यानंतर रहीमने नसुमला चेंडूने मारण्यासाठी हात उगारला. त्यानंतर मैदानातील इतर खेळाडूंनी मिळून त्याला शांत केले.

रहीमने मागितली अहमदची क्षमा
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत रहीमने अहमदची क्षमा मागितली आहे. त्याने लिहिले की, ‘सर्वप्रथम मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि दर्शकांची क्षमा मागतो. तसेच अहमद तुझीही मी क्षमा मागतो. मी एक माणूस आहे आणि मी जे काही मैदानावर केले, ते चुकीचे होते. पण मी हमी देतो की, इथून पुढे मैदानावर किंवा मैदानाबाहेर अशी चूक माझ्याहातून कधीही होणार नाही.’

https://www.instagram.com/p/CIzde1Np7jH/?utm_source=ig_web_button_share_sheet

या पोस्टसोबत रहीमने त्याचा अहमदसोबत जिममध्ये बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून हसताना दिसत आहेत. याचा अर्थ असा होतो की, अहमदनेही रहीमला त्याच्या वागणुकीसाठी माफ केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुशफीकूर रहीमने उगारला युवा खेळाडूवर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

मयंकसोबत सलामीला कोण उतरणार? गावसकरांनी सुचवले ‘हे’ नाव

भन्नाटच! ख्रिस लिनचा षटकार पाहून गोलंदाजही अवाक, दिली अशी प्रतिक्रिया; पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---