सध्या बांगलादेशचा पाकिस्तान दौरा सुरु आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला कसोटी सामना रावलपिंडी मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 6 विकेट्स गमावून 448 धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशनं पहिल्या डावात मुशफिकुर रहीमच्या (Mushfiqur Rahim) शतकामुळे आघाडी घेतली. या सामन्यात रहीमनं शानदार शतक झळकावून इतिहास रचला.
मुशफिकुर रहीमनं (Mushfiqur Rahim) आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 11वं शतक झळकावलं, यासह त्याच्या नावावर एक मोठा रेकाॅर्ड झाला. रहीम आता सर्वात जास्त वयात कसोटी शतक झळकावणारा बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा दुसरा बांगलादेशी फलंदाज बनला.
बांगलादेशच्या 2 फलंदाजांनी आतापर्यंत पाकिस्तानमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानंतर रहीम आता पाकिस्तानमध्ये शतक ठोकणारा तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला. 2003 मध्ये जावेद उमरनं, पेशावरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 119 धावांची शानदार शतकी खैळी केली होती. त्यानंतर हबीबल बशरनं 2003 मध्ये कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 108 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता रहीमनं रावलपिंडीत नाबाद 101 धावांची खेळी केली.
मुशफिकुर रहीमचं (Mushfiqur Rahim) वय सध्या 37 वर्ष 107 दिवस आहे. त्याच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं बांगलादेशसाठी 88 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 38.09च्या सरासरीनं 5,777 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्यानं 27 अर्धशतक आणि 11 शतक झळकावले आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 219 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
6,6,6,6….निकोलस पूरनचा कहर! षटकारांच्या बाबतीत सूर्या, बटलरला मागे टाकलं
आफ्रिदी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, शाहिनच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; महत्त्वाच्या मालिकेपूर्वी स्टार गोलंदाज गंभीर जखमी