---Advertisement---

मुस्तफिजुर रहमान बाहेर! कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात येणार ‘हा’ घातक गोलंदाज?

On: शनिवार, जानेवारी 3, 2026 8:05 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 मध्ये आता पाकिस्तानप्रमाणेच कोणताही बांगलादेशी क्रिकेटपटू खेळताना दिसणार नाही. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2009 पासूनच पाकिस्तानी खेळाडूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे आणि आता बांगलादेशच्या सर्व खेळाडूंचीही गच्छंती झाली आहे. म्हणजेच, मार्च ते मे दरम्यान होणाऱ्या 19 व्या आयपीएलमध्ये ना कोणताही पाकिस्तानी खेळाडू या स्पर्धेचा भाग असेल, ना कोणताही बांगलादेशी क्रिकेटपटू.

बीसीसीआयने म्हटले आहे की, जर KKR (कोलकाता नाईट रायडर्स) एखाद्या बदली खेळाडूची मागणी करत असेल, तर ते त्यांना त्याची परवानगी देतील. आता कोलकाताचे टीम मॅनेजमेंट कोणत्या ‘लेफ्ट आर्म पेसर’ला आपला पर्याय बनवते किंवा इतर कोणत्या गोलंदाजावर पैसे खर्च करू इच्छिते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नुकत्याच झालेल्या लिलावात इंग्लंडचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन, ऑस्ट्रेलियाचा झाई रिचर्डसन आणि दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झी यांसारखे नामांकित गोलंदाज विकले गेले नाहीत, ते ‘अनसोल्ड’ राहिले होते.

याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन, ज्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती, तो देखील या लिलावात विकला गेला नाही. 30 वर्षांच्या स्पेन्सर जॉन्सनच्या नावावर 8 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 8.96 च्या इकॉनॉमीने 14 विकेट्स आहेत.
अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती. 25 वर्षांच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या नावावर 51 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 6.93 च्या इकॉनॉमीसह 63 विकेट्स आहेत आणि तो KKR साठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

इंग्लंडच्या 33 वर्षीय टायमल मिल्सच्या नावावर 16 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 8.83 च्या इकॉनॉमीसह 14 विकेट्स आहेत. मात्र, घरगुती टी-20 सामन्यांमध्ये त्याला 262 सामन्यांचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने 8.35 च्या इकॉनॉमीने 325 विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाताच्या संघासमोर अनेक पर्याय असतील ज्यावर ते शिक्कामोर्तब करू शकतात. कोलकाता संघ डावखुऱ्या गोलंदाजालाच प्राधान्य देतो की यापैकी कोणाची निवड करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

16 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावा दरम्यान, बांगलादेशी डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानसाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली होती. त्यानंतर चेन्नई आणि कोलकाता हे संघ त्याला संघात घेण्यासाठी शर्यतीत उतरले. अखेर 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या 30 वर्षीय मुस्तफिजुर रहमानला कोलकाताने 9.20 कोटी रुपयांना खरेदी करून त्याला आयपीएलमधील बांगलादेशचा सर्वात महागडा खेळाडू बनवले होते.

मुस्तफिजुरच्या नावावर 126 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 7.20 च्या इकॉनॉमीसह 158 विकेट्स आहेत. आयपीएलच्या 60 सामन्यात 8.13 च्या इकॉनॉमीसह त्याने 65 विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशचे इतर 6 खेळाडू रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तंझीम हसन साकिब, नाहिद राणा, शोरिफुल इस्लाम आणि रकिबुल हसन लिलावात विकले गेले नाहीत. मीडियामध्ये अशा बातम्याही आल्या होत्या की, बीसीसीआयच्या मते बांगलादेशी खेळाडूंवर लिलावासाठी कोणतीही बंदी नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---