बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याने न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी -२० मध्ये शानदार गोलंदाजी केली आणि ४ बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. रहमानने त्याच्या अप्रतिम गोलंदाजी व्यतिरिक्त एक झेल देखील घेतला ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तो झेल खास ठरला आहे कारण रहमानने स्वतःच्या गोलंदाजीवर हवेत डायव्ह मारत झेल टिपला. रहमानच्या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
न्यूझीलंडच्या डावातील १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज कोले मॅकॉन्चीला बाद करण्यात यशस्वी झाला. मुस्तफिजूरने चतुरपणे गोलंदाजी करत फलंदाजाला चकवले. त्याने त्याच्या चेंडूची गती बदलली, जी न्यूझीलंडच्या फलंदाजाला समजली नाही आणि रहमानने अप्रतिम झेल घेतला.
Mustafizur magic #BANvNZ pic.twitter.com/dJoUIamwE3
— Aaron Murphy (@AaronMurphyFS) September 8, 2021
बाद झाल्यानंतर मॅकॉन्ची आश्चर्यचकित झाला होता. चौथ्या टी-२० मध्ये न्यूजीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली आणि ते केवळ ९३ धावा करू शकले. विल यंग व्यतिरिक्त दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. विलने ४६ धावांची खेळी खेळली. या टी-२० मालिकेत बांगलादेशने अप्रतिम कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या ३ सामन्यांपैकी बांगलादेश दोन सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे, तर तिसरा टी- २० सामना न्यूझीलंडचा संघ जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
या ५ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड फलंदाजांना बांगलादेशच्या खेळपट्टीवर व्यवस्थित फलंदाजी करता आलेली नाही. मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड ६० धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने १३७ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने १२८ धावा केल्या. मात्र, या सामन्यात बांगलादेश केवळ ७६ धावांवर बाद झाला. यामुळे न्यूझीलंड संघाने ५२ धावांनी विजय मिळवला होता.
चौथ्या सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी पुन्हा अपयशी ठरली आणि ९३ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला आणि बांगलादेशने सहा गडी राखून विजय मिळवला तसेच मालिका देखील खिशात घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी मेंटर बनण्यामुळे टीम इंडियाला होऊ शकतात ‘हे’ ५ फायदे
बायको असावी अशी! चहलचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पत्नी धनश्रीने केली खास पोस्ट शेअर
पाचव्या कसोटीत येणार पावसाचा अडथळा? वाचा हवामानाचा अंदाज