पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत एमडब्लूटीए, डायमंड्स, एमडब्लूटीए ऍसेस, एफसी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निलेश ओस्तवाल, जयदीप वाकणकर, विवेक खडगे, आशिष मणियार, प्रवीण पांचाळ, राजेश मकनी यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए संघाने एमराल्डसचा 18-0असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात डायमंड्स संघाने एफसी लिजेंडस संघावर 18-3असा विजय मिळवला.विजयी संघाकडून कौस्तुभ शहा, सारंग देवी, योगेश पंतसचिव, सारंग पाबळकर, अमित लाटे, मिहीर दिवेकर यांनी अफलातून कामगिरी बजावली.अन्य लढतीत एमडब्लूटीए ऍसेस संघाने सफायर्स संघावर 18-0असा एकतर्फी विजय मिळवला.एफसी अ संघाने लॉ कॉलेज लायन्स संघाचा 18-14असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एमडब्लूटीए वि.वि.एमराल्डस 18-0(80अधिक गट: निलेश ओस्तवाल/जयदीप वाकणकर वि.वि.पराग चोपडा/राहुल गांगल 6-0;खुला गट: विवेक खडगे/आशिष मणियार वि.वि.शैलेश लिमये/कल्पक पत्की 6-0; प्रवीण पांचाळ/राजेश मकनी वि.वि.हर्षद भागवत/भाग्यश्री देशपांडे 6-0);
डायमंड्स वि.वि.एफसी लिजेंडस 18-3(80अधिक गट: कौस्तुभ शहा/सारंग देवी वि.वि.राजेश जोशी/अविनाश हूड 6-2; खुला गट: योगेश पंतसचिव/सारंग पाबळकर वि.वि.संजय पाटील/योगेश नातू 6-1; अमित लाटे/मिहीर दिवेकर वि.वि.रोहित शेवाळे/महेंद्र देवकर 6-0);
एमडब्लूटीए ऍसेस वि.वि.सफायर्स 18-0(80अधिक गट: सुनील लुल्ला/राहुल सिंग वि.वि.रवी रावळ/हरीश गलानी 6-0; खुला गट: शायनी बरेटो/विक्रम गुलानी वि.वि.पराग तेपण/राहुल रोडे 6-0; पार्थ महापात्रा/अभिषेक सिंग वि.वि.सुनीता रावळ-अर्जुन रावळ 6-0);
एफसी अ वि.वि.लॉ कॉलेज लायन्स 18-14(80अधिक गट: संजय रासकर/पुष्कर पेशवा वि.वि.जयभाई/इंद्रनील दाते 6-4; खुला गट: आदित्य अभ्यंकर/सुनील लोणकर वि.वि.अभिजित मराठे/शिवाजी यादव 6-5(7-3); पंकज यादव/गौतम शहा वि.वि.तारक पारीख/केतन जाठर 6-5(7-4)).