भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) 24 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी दिग्गज क्रिकेटपटू चेतन शर्मा यांना निवड समिती प्रमुख बनवण्यात आले आहे. चेतन शर्मा यांच्यासोबतच देबाशिष मोहंती व अबे कुरुविला यांना देखील निवड समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. चेतन शर्मा हे आपल्या 1987 विश्वचषकातील हॅट्रिकसाठी संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहेत.
चेतन शर्मा यांची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘ भारतीय क्रिकेटची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी मिळत असल्याने ही निश्चितच माझ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. मी यासाठी बीसीसीआयचा आभारी आहे.’
‘मी जास्त बोलत नाही पण माझे काम निश्चितच बोलणार,’ असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चेतन शर्मा यांनी आपल्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भारतासाठी 23 कसोटी आणि 65 वनडे सामने खेळले आहेत. चेतन शर्मा यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. हरियाणासाठी देखील अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट खेळलेले आहे. हरियाणा संघात त्यांना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी समाविष्ट करण्यात आले होते.
बीसीसीआयमधील सध्याच्या नियमानुसार सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या व्यक्तीला निवड समितीचे अध्यक्षपद दिले जाते. त्यानुसार सुनील जोशी यांच्या ऐवजी चेतन शर्मा निवड समीतीचे अध्यक्ष झाले आहेत. तर सुनील जोशी निवडकर्ता म्हणून निवड समीतीत कायम आहेत. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
अजित आगरकर का नाही बनले टीम इंडियाचे निवडकर्ता? घ्या जाणून
अनुभव कर्णधारपदाचा! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कशी राहिली भारतीय संघाची कामगिरी, पाहा
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम