भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलु हार्दिक पंड्या (hardik pandya) तंदुरुस्त झाल्यानंतर भारतीय संघात परतण्यास तयार झाला आहे. टी२० विश्वचषकातून बाहेर झालेल्या हार्दिकने खुलासा केला आहे की, तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात (T20 world cup) खेळण्यास उपलब्ध असणार आहे. आयपीएल २०२२ (ipl 2022) मधून तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या हंगामात ८ नाही तर १० संघ खेळणार आहेत. हार्दिक अहमदाबाद संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या संघाने त्याला १५ कोटींना विकत घेतले आहे. तसेच, या संघात त्याच्याबरोबर राशिद खान आणि शुबमन गिल सुद्धा खेळताना दिसणार आहेत.
ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार असून, भारतीय संघाला आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा एकाच गटात ठेवण्यात आले आहे. २०२१ मध्ये हार्दिक त्याच्या फिटनेसमुळे गोलंदाजी करु शकलेला नाही. तो फलंदाजीतही अपयशी ठरला. त्यामुळे २०२१ हे वर्ष त्याच्यासाठी खराब ठरले आहे. आता या वर्षात तो खास कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “टी २० विश्वचषकाच्या काळात पुर्णपणे तयार राहण्यासाठी माझी तयारी सुरु आहे. प्रशिक्षण आणि नियोजन लक्षात घेवून माझी संपूर्ण तयारी सुरु असून, मला देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. आयपीएल २०२२ हे माझ्यासाठी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने एक व्यसपीठ असणार आहे. माझी पुर्ण तयारी विश्वचषक आणि भारतीय संघासाठी आहे.”
हार्दिक पंड्या पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आपल्या कारकीर्दिची सुरुवात केली होती. पण, या हंगामात त्याला मुंबई इंडियन्स संघात ठेवण्यात आले नाही. कर्णधार म्हणुनही तो पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. तसेच तो त्याचा आवडता कर्णधार एमएस धोनीच्या विरुद्ध खेळताना दिसेल.
हार्दिकच्या पाठीवर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. गेल्यावर्षी त्याचा त्रास त्यााला पुन्हा झाला. त्यामुळे त्याच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. दुखापतीतुन सावरल्यानंतर त्याने खुप कमी वेळा गोलंदाजी केली आहे. त्याच्या या खराब कामगिरीनंतर तो या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
लखनऊ सुपरजायंट्सच्या लोगोची रंजक कहाणी; पुराणातील दाखले आणि आधुनिकतेचा साज (mahasports.in)
‘या’ कारणामूळे स्टार्कने घेतली मेगा लिलावातून माघार; म्हणाला… (mahasports.in)