आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने आयपीएल 2025 स्पर्धेची ट्रॉफी जिंकली, पण चॅम्पियन झाल्यानंतर पुढच्याच दिवशी संघाचं सेलिब्रेशन दुःखामध्ये बदललं. चिनास्वामी स्टेडियमच्या बाहेर सेलिब्रेशन करताना चाहत्यांच्या गर्दीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि 33 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या प्रकरणात आरसीबी संघ कर्नाटक क्रिकेट असोसिएशन या सर्वांवर खूप प्रकारचे आरोप झाले. तसेच चार जणांना अटक देखील करण्यात आली, ज्यामध्ये आरसीबीचे मार्केटिंग हेड हे देखील सामील आहेत.
या वादानंतर आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यू वर देखील फरक पडलेला आहे. अशा देखील अफवा पसरत आहेत की, आरसीबी संघ विकण्याच्या विचार केला जात आहे. त्यामध्येच अशी बाब देखील समोर आली की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला खरेदी करण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार इच्छुक आहेत. या प्रकरणावर त्यांनी वक्तव्य केल आहे ज्याने अफवांना बंद होतील.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री एएनआय सोबत बातचीत करताना त्यांनी म्हटले आहे, की मी वेडा माणूस नाही मी खूप काळापासून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी जोडलेला आहे आणि हीच फक्त खरी गोष्ट आहे. माझ्याकडे वेळ नाही मला मॅनेजमेंट कडून सहभागी होण्याची ऑफर आली होती पण मला आरसीबीची काय गरज आहे?
आरसीबीच्या विकण्याच्या अफवांवर आता साफ स्पष्ट झाले आहे की, असा कोणताही विचार नाही आरसीबी फ्रेंचाईजीचे मालक डीयाजिओ इंडिया आहेत. त्यांनी बीसीसीआयच्या निगराणी विभागाला लिहिलेल्या पत्रात या गोष्टीला अफवा असे म्हटले आहे.






