आयपीएल सुरू आहे. आता क्रिकेटचा किडा असणाऱ्या सर्वांची संध्याकाळ ड्रीम इलेव्हन लावण्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या जिंकलेल्या टीमचे स्टेटस ठेवण्यापर्यंत चालते. जगातील या सर्वात मोठ्या लीगमधील सामनेही तशाच होतात. अगदी लास्ट बॉलपर्यंत गेलेले सामने आयपीएल का एवढी भारी आहे, हे सिद्ध करतात. एवढं सगळं एंटरटेनमेंट असतानाही आपल्याला आणखी नेत्रसुख देण्याचे काम करतो आयपीएलचा कॅमेरामन दादा. आयपीएलची क्रेझ अशी आहे की, अगदी अबालवृद्ध सामने पाहण्यासाठी ग्राउंडवर येतात. यामध्ये अनेक सुंदर तरुणींचाही समावेश असतो. नेमकी यातील एखाद्या तरुणीची स्माईल हा कॅमेरामन दादा ३-४ सेकंद टीव्हीवर दाखवतो आणि रातोरात ती तरुणी नॅशनल क्रश बनून जाते. अशाच आयपीएलमधून सर्वप्रथम दिसलेल्या ‘मिस्ट्री गर्ल्स’ ज्या लाखो दिलांची धडकन बनल्या त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
या यादीची सुरुवातच आपण नुकत्याच सुरू असलेल्या आयपीएलपासून करू. दोन वर्ष आयपीएलमध्ये फॅन्सला येण्याची परवानगी नव्हती. यावेळी ही परवानगी दिली गेली. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या पहिल्याच सामन्याला सीझनची पहिली मिस्ट्री गर्ल दिसली. सीएसकेची हालत खराब असतानाच कॅमेरामनने कॅमेरा फॅन्समध्ये फिरवला आणि हि मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेस पडली. लगेच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आणि काही मिनिटात तिच्या नावाचा इंस्टाग्राम आयडीचा शोध लावला गेला. या आयपीएल २०२२ च्या मिस्ट्री गर्लचे नाव आहे देविका नायर आणि ती डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करते. आपण व्हायरल झालो हे समजताच तिने स्वतःही ‘ती मीच’ असे कबूल करत स्टेडियममधील फोटोजची इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली.
इथे जमलेल्या माझ्या तमाम सिंगल लग्नाळू मित्रा मंडळी नो #IPL2022 सुरू झाली आहे असेच अनेक चेहरे पाहायला मिळतील.
आजचे समाजकार्य.#devikanair pic.twitter.com/rIIF1uqswx
— Avadhut Kelkar (modi ka parivar) (@kelkaravadhut) March 27, 2022
२०१८ ला दोन वर्षाच्या बॅननंतर सीएसके कमबॅक करत होती. त्यांची पहिलीच मॅच होती कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्ससोबत. त्यावेळी देखील सीएसकेला सपोर्ट करताना एक सुंदर दिसली. अनेकांना प्रश्न पडला यार ही कोण? प्रश्न पूर्ण होत नाही तोपर्यंतच अनेकांनी तिच्या नावाचा गावाचा शोध लावला. ती मिस्ट्री गर्ल होती मालती चाहर. सीएसकेचा ऑलराऊंडर दीपक चाहरची बहिण. आपल्या भावाला आणि फेवरेट धोनीला सपोर्ट करायला ती स्टेडियममध्ये आली होती आणि इंटरनेट सेंसेशन बनली.
https://www.instagram.com/p/CP8fE1DMu1c/
मालतीप्रमाणेच आणखी एक सुंदर मुखडा सर्वांच्या हृदयाची धडकन बनला मुंबई इंडियन्सला चिअर करताना. २०१९ च्या फायनलला दिसलेली ही मिस्ट्री गर्ल होती आदिती हंडिया. तिच्या स्माईलवर कदाचित कॅमेरामन फिदा झाला असावा आणि त्यानंतर तिला फेमस केली. जरा शोध काम केल्यावर समजून आले की, ही आदिती काही सिंपल गर्ल नव्हती. ती २०१८ ला मिस इंडिया फायनलिस्ट ठरलेली. तसेच मिस वर्ल्डमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्वही केलेले. आता एवढेच नव्हे, तर तिचे नाव आपल्या मुंबई इंडियन्सच्या ईशान किशन सोबतही जोडले जाते. जरा इंस्टाग्राम सर्च मारा दोघांचे क्युट फोटो दिसून येतील.
#AditiHundia 💙 #MI #CSK #IPL pic.twitter.com/ihmbl6X7CT
— போதி தர்மர் (@nanbanraj007) May 12, 2019
आयपीएल २०१९ मध्ये सीएसके आरसीबी सामन्यामध्ये धोनीने कोरी अँडरसनला मारलेले षटकार कदाचित अनेकांना आठवत नसतील. पण त्याच सामन्यामध्ये व्हायरल झालेली रेड टॉपमधील ती मिस्ट्री गर्ल अनेकांच्या मोबाईल गॅलरीत असेल. त्या टेन्शन वाढवणाऱ्या सामन्यामध्ये अनेकांचा क्रश बनलेली ती परमसुंदरी होती दीपिका घोष. कोरियोग्राफर असलेल्या दीपीकाची त्या वर्षीच्या आयपीएलमध्ये तुफान चर्चा झालेली.
Man of the match award goes to the – Cameraman &
FBB stylish player – Deepika ghosh#RCBvSRH #IPLT20 #IPL2019 pic.twitter.com/0PDXhr2TuP— Paresh Solanki (@Paresh_official) May 5, 2019
कोरोना काळात जेव्हा आयपीएलचा सरंजाम २०२० मध्ये युएईत पोहोचला, तेव्हा अनेक चित्तथरारक मॅचेसचा अनुभव आपण घेतला. आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक सामना त्याचवेळी झाला. मुंबई आणि पंजाबच्या सामन्यामध्ये डबल सुपर ओवर झाली. या डबल सुपर ओवरव्यतिरिक्त एका मिस्ट्री गर्लसाठी देखील ही मॅच चर्चेत राहिली. पंजाबला सपोर्ट करणारी मास्क लावलेली ब्राऊन आईजची ती ‘सपनो की राजकुमारी’ कोण? या प्रश्नाचे उत्तर अनेक जण दोन दिवस शोधत होते. अखेर तिच्या नावाचा खुलासा झाला. ती होती रियाना ललवाणी. भारतातीलच असलेली रियाना त्यावेळी दुबईत शिक्षण घेत होती. आजही तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलेले आहे…’दॅट सुपर ओव्हर गर्ल’
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद
जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video
हिला डाला ना! ओडियन स्मिथ इतका जोरात शिंकला की, पंजाबचे खेळाडू धडाधड कोसळले, Video व्हायरल