केकेआरचा युवा फलंदाज रिंकू सिंग याने आयपीएलमध्ये रविवारी (10 एप्रिल) धमाकेदार खेळी करत केकेआरला विजय मिळवून दिला. गुजरात टायन्सविरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या पाच चेंडूवर पाच षटकार रिंकूने मारले आणि सामना जिंकला. त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीनंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या या खेळीनंतर केकेआरच्या डग आऊटमधील सर्वजण रोमांचित होऊन मैदानाकडे पळाले होते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एका छायाचित्रात त्याच डग आऊट मधील एक व्यक्ती अत्यंत गंभीर होऊन बसल्याचे दिसते. ही व्यक्ती नक्की कोण याबाबत चर्चा चांगलीच रंगली आहे.
Who’s this guy? not looking very happy with Rinku’s finish! 😹 pic.twitter.com/fovokGVPdd
— BALA (@erbmjha) April 9, 2023
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर समोरासमोर आले होते. हा सामना अखेरपर्यंत गुजरात टायटन्सच्या पारड्यात होता. मात्र, शेवटच्या पाच चेंडूंवर रिंकू सिंग याने सलग पाच षटकार ठोकले आणि संघाला आवश्यक असलेल्या 28 धावा पूर्ण केल्या. त्याच्या अखेरच्या षटकानंतर संघातील सर्व खेळाडू मैदानाकडे धावले.
संघाच्या सपोर्ट स्टाफमधील प्रशिक्षक देखील मैदानाकडे पळाले असताना एक दाढी असलेल्या व्यक्ती अत्यंत गंभीर मुद्रेने त्याच जागी बसलेला पाहायला मिळाला. हा व्यक्ती कोण याबाबत चांगलीच चर्चा रंगली.
सोशल मीडियावर चर्चेत असलेले हे व्यक्ती एआर श्रीकांत हे आहेत. श्रीकांत हे कोलकाता नाईट रायडर्स साठी परफॉर्मन्स अँड ऍनालिसिस एक्सपर्ट म्हणून काम करतात. श्रीकांत हे केवळ आयपीएलच नव्हे तर जगातील इतर लीगमध्ये देखील विविध संघांसाठी हे काम पार पाडतात. केकेआरसोबत ते 2009 पासून काम करत असून, त्यांनी केकेआरचा टॅटू देखील गोंदवून घेतला आहे. कुलदीप यादव तसेच शुबमन गिल या खेळाडूंना सर्वात आधी संधी देण्यासाठी त्यांना ओळखले जाते.
(Mystery Man AR Srikanth In KKR Dugout After Rinku Singh Hits Historic Five Sixes Against Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCBvLSG| चिन्नास्वामीवर नाणेफेक सुपरजायंट्सच्या पारड्यात, आरसीबीची प्रथम फलंदाजी
युवा कबड्डी सिरीजमध्ये आकाश शिंदेचं जोरदार आगमन