Vijay Hazare Trophy 2023: मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने विजय हजारे ट्रॉफी 2023 स्पर्धेत मंगळवारी (दि. 5 डिसेंबर) कहर गोलंदाजी केली. वरुणने त्याच्या अ दर्जाच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केले. आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या या फिरकीपटूने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये इ गटातील सामन्यात तमिळनाडूसाठी खेळताना नागालँडविरुद्ध कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली.
वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी
वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याने फक्त 5 षटके गोलंदाजी करताना 3 षटके निर्धाव टाकली. यावेळी त्याने फक्त 9 धावा खर्चत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने नागालँडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. तमिळनाडूसाठी वरुणने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
फायदेशीर ठरली कर्णधाराची रणनीति
तमिळनाडू (Tamilnadu) संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने पहिल्याच पॉवरप्लेमध्ये वरुण चक्रवर्ती याला गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. त्याची ही रणनीति फायदेशीर ठरली. तमिळनाडूचे वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि संदीप वॉरियर यांनी नागालँडच्या सलामीवीरांना तंबूत धाडले. त्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Mystry Spinner Varun Chakravarthy) आणि साई किशोर यांनी कमाल केली.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या साई किशोर याने 5.4 षटके गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या. नागालँडचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 69 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर साई किशोर (नाबाद 37) आणि एन जगदीशन (नाबाद 30) यांनी फक्त 7.5 षटकात एकही विकेट न गमावता आव्हान पार केले.
वरुणचे शानदार प्रदर्शन
तमिळनाडूने 6 सामन्यात 20 गुण मिळवले आहेत. तमिळनाडूला आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी फक्त 1 सामन्यात पंजाबविरुद्ध पराभव पत्करावा लागला. वरुण चक्रवर्ती याने तमिळनाडूकडून चालू विजय हजारे ट्रॉफी 2023 (Vijay Hazare Trophy 2023) स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले आणि 6 सामन्यात 14 विकेट्सही घेतल्या आहेत.
Varun Chakravarthy took 5 wickets for 9 runs against Nagaland…!!!!
– he has taken 14 wickets from just 6 games in Vijay Hazare 2023. pic.twitter.com/Ex5PI2XRpB
— Johns. (@CricCrazyJohns) December 5, 2023
वरुणविषयी बोलायचं झालं, तर तो विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी करत आहे. अशात तो आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेतही शानदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. केकेआरने वरुणला आगामी हंगामासाठी रिटेन केले आहे. अशात, तो या स्पर्धेत शानदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (mystry spinner varun chakravarthys career best figure took five wickets for 9 runs in vijay hazare trophy 2023)
हेही वाचा-
‘इथे खेळाडूंना सिलेक्ट नाही, रिजेक्ट करतात, ही भारतीय क्रिकेटची…’, इशान किशनविषयी दिग्गजाचे मोठे विधान
अवघ्या 23व्या वर्षी बोहल्यावर चढला आफ्रिकन गोलंदाज, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच थाटला संसार; पाहा Photos