---Advertisement---

कहर! धोनीने बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजाने दाखवला दम, अवघ्या ७ सामन्यात चोपल्या ३५० धावा

On: रविवार, जानेवारी 31, 2021 8:27 AM
---Advertisement---

भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेचा थरार चालू आहे. नुकत्याच पार पडलेल्या उपांत्य फेरी सामन्यात तमिळनाडूने ७ विकेट्सने राजस्थानवर मात करत अंतिम सामना गाठला. तर बडोदाने २५ धावांनी पंजाबला पराभवाची धूळ चारत अंतिम फेरीत धडक मारली. आज (३१ जानेवारी) हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी अखेरची झुंज देणार आहेत. या सामन्यादरम्यान तमिळनाडूचा खेळाडू एन जगदीशन याच्यावर सर्वांची नजर असणार आहे.

धोनीने अर्ध्याहून अधिक सामन्यात बसवले बाकावर 

या २५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाला गतवर्षी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने विकत घेतले होते. मात्र अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्याने संघ कर्णधार एमएस धोनीने जगदीशनला अधिकतर सामन्यात बाकावर बसवून ठेवले. आयपीएल २०२० च्या पूर्ण हंगामात जगदीशनला फक्त ५ सामन्यात संघातील ११ जणांच्या अंतिम पथकात स्थान मिळाले. त्यातही फक्त २ डावात फलंदाजीची संधी मिळाल्याने त्याने अवघ्या ३३ धावा केल्या.

जगदीशनची धडाकेबाज फलंदाज

परंतु जगदीशन सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतील तमिळनाडू संघाचा सलामीवीर फलंदाज असल्याने त्याला आपल्यातील प्रतिभा सर्वांना दाखवण्याची पुरेपूर संधी मिळाली. या टी२० स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले असून तब्बल ३५० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ८७.५०च्या सरासरीने आणि १४२ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. सोबतच चार अर्धशतकी खेळी केल्या आणि १७ षटकार खेचले.

एवढेच नव्हे तर, जगदीशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २३ सामन्यात ३९.१३च्या सरासरीने ११७४ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २३ सामन्यांत ७९० धावा आणि ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३४ सामन्यांत ६८८ धावा आहेत. आता जगदीशनची कमालीची फटकेबाजी पाहिल्यानंतर धोनी आयपीएल २०२१ मध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी देईल, अशी सर्वांना अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणार्‍या प्रियांकला आता तरी संधी मिळणार का?

भारताविरुद्ध गोलंदाजांची भूमिका निर्णायक! इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांचे मत

भाऊ सॉरी ना..! फलंदाजाचं शतक अडवण्यासाठी पठ्ठ्याने टाकला वाईड बॉल, नंतर स्वत:च मागितली माफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---