---Advertisement---

IPL 2021: वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिळवली लिलावात जागा, आता रोहितचा संघ लावणार मोठी बोली?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 12, 2021 4:10 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. त्या अनुशंगाने फार पुर्वीच आयपीएल संघांनी देशांतर्गत क्रिकेटमधील नवनवीन चेहऱ्यांना पारखण्यास सुरुवात केली होती. त्याचाच भाग म्हणून, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने नागालँडचा युवा फिरकीपटू ख्रिवित्सो केन्से याला चाचणीसाठी निमंत्रित केले होते. आता याच केन्सेला आयपीएलने शॉर्टलिस्ट केलेल्या २९२ खेळाडूंमध्ये जागा मिळाली आहे.

आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या एकूण २९२ खेळाडूंमध्ये १६४ भारतीय आणि १२५ परदेशी खेळाडू आहेत. उर्वरित ३ खेळाडू हे असोसिएट देशांचे असतील. या निवडक भारतीय खेळाडूंमध्ये केन्सेच्या नावाचाही समावेश आहे. त्याला २० लाख बेस प्राइज असलेल्या खेळाडूंच्या यादीत सहभागी करण्यात आले आहे. यासह केन्से हा आयपीएल २०२१ च्या लिलावात उतरणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.

मुंबई इंडियन्सने दिले होते निमंत्रण
पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या काही खेळाडूंना त्यांनी मुंबई येथे चाचणीसाठी बोलावून घेतले होते. या खेळाडूंमध्ये नागालँडचा १६ वर्षीय लेगस्पिनर केन्सेचा देखील समावेश होता. मुंबईचे युवा खेळाडू शोधणारे प्रशिक्षक केन्सेचा खेळ पाहून प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले होते.

आयपीएल खेळणारा नागालँडचा पहिला क्रिकेटपटू बनवू शकतो केन्से
एका आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ दरम्यान मुंबईच्या प्रशिक्षक गटाचे काही लोक केन्सेचा खेळ पाहून प्रभावित झाले होते. त्यामुळे नागालँडमधील एका अत्यंत छोट्या खेड्यातून येणार्‍या केन्सेला मुंबई संघाकडून चाचणीसाठी बोलावणी आली होती. त्यानंतर नुकताच तो आयपीएल लिलावात देखील सहभागी झाला आहे. अशात जर मुंबईने त्याला ताफ्यात सहभागी केली आणि आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची संधी दिली; तर तो आयपीएल खेळणारा उत्तर पूर्वीय विभागातील पहिला क्रिकेटपटू बनेल.

टी२० स्पर्धेत केन्सेने केली दमदार कामगिरी
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ या स्पर्धेत केन्सेने दमदार कामगिरी केलेली दिसून येते. केन्सेने स्पर्धेत चार सामने खेळताना ७ बळी मिळवले होते. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ५.७० इतका प्रभावी राहिलेला. केन्से प्रतिनिधित्व करत असलेल्या नागालँड संघानेही स्पर्धेत चार सामने खेळताना चारही सामन्यात विजय मिळवला होता. तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या-

भज्जी, केदारसह ‘या’ खेळाडूंसाठी पडणार पैशांचा पाऊस; हजार-लाख नव्हे तर २ कोटींपासून सुरू होणार बोली

IPL 2021: श्रीसंतच्या पदरी निराशा, लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये नाही मिळालं स्थान

आपल्याच नात्यातील मुलीवर झाले होते सेहवागला प्रेम, घरच्यांच्या विरोधानंतरही यशस्वी ठरली लव्हस्टोरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---