भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. मोहाली येथे झालेला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतलीये. मात्र, आता नागपूर सामन्यावर पावसाचे सावट दिसून येत आहे. पावसामुळे ओले झालेले मैदान खेळण्यासाठी सामना उशिराने सुरू होईल.
A wet outfield has delayed the toss in Nagpur ☔#INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/qNZMmN8MGZ pic.twitter.com/4mVm61T4Xp
— ICC (@ICC) September 23, 2022
नागपूर येथे मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. त्यामुळे नागपूर येथे पोहोचलेल्या दोन्ही संघांना सराव करता आला नव्हता. सामन्या दिवशी पाऊस पडला नसला तरी सलग तीन दिवसाच्या पावसामुळे मैदान खेळण्यासाठी अद्याप योग्य नाही. सामना नियोजित वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार होता. मात्र, 7 वाजता दोन्ही पंचांनी मैदानाचे निरीक्षण केले. त्यानंतर आता पुढील निरीक्षण 8 वाजता होईल.