भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. मोहाली येथे झालेला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतलीये. उभय संघातील हा दुसरा सामना खराब मैदानामुळे तब्बल अडीच तासाने म्हणजे रात्री 9.30 वाजता सुरू होईल. हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा होईल.
🚨 Update 🚨
Play to commence at 09.30 PM IST. 👏
Toss will take place at 09.15 PM IST. 👍
The second @mastercardindia #INDvAUS T20I will be an eight overs/side match. #TeamIndia pic.twitter.com/qZtKmTm3oG
— BCCI (@BCCI) September 23, 2022
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.15 वाजता नाणेफेक होईल. तर त्यानंतर पंधरा मिनिटांनी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
नागपूर येथे मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. त्यामुळे नागपूर येथे पोहोचलेल्या दोन्ही संघांना सराव करता आला नव्हता. सामन्या दिवशी पाऊस पडला नसला तरी सलग तीन दिवसाच्या पावसामुळे मैदान खेळण्यासाठी अद्याप योग्य नाही. सामना नियोजित वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार होता. मात्र, 7 वाजता दोन्ही पंचांनी मैदानाचे निरीक्षण केले. त्यानंतर आता पुढील निरीक्षण 8 वाजता झाले. 8 वाजून 45 मिनिटांनी झालेल्या अखेरच्या निरीक्षणानंतर सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा