भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारा करुण इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. नायरचा हा पहिलाच काऊंटी हंगाम असून नॉर्थऍम्पटनशायर संघासाठी त्याने दुसऱ्याच सामन्यात 150 धावांची खेळी केली आहे. नायर आणि टॉम टायलर यांच्या योगदानामुळे नॉर्थऍम्पटनशायर संघ पहिल्या डावात 350 पेक्षा अधिक धावा करू शकला.
काऊंट क्रिकेटच्या 2023 हंगामातील मंगळवारी (19 सप्टेंबर) नॉर्थऍम्पटनशायर आणि सरे संघातील सामना सुरू झाला. करूण नायरसाठी काऊंटी क्रिकेटमधील हा अवघा दुसरा सामना असून त्याने गुणवत्ता सिद्ध केली. आपल्या पहिल्या सामन्यात करुण नायर (Karun Nair) एकाच डावात 78 धावांची खेळी करू शकला होता. मात्र, मंगळवारी सुरू झालेल्या या सामन्यात करुणने पहिल्या दिवसाखेर 51* , तर दुसऱ्या दिवसाखेर 144* धावा केल्या होत्या. गुरुवारी (21 सप्टेंबर) अखेर त्याने वैयक्तिक 150 धावांची खेळी करून विकेट गमावली. यासाठी त्याने 246 धावा खेळल्या असून 23 चौकार आणि 2 षटकात या खेळीत मारले.
नॉर्थऍम्पटनशायर संघाने या सामन्यातील पहिल्या डावात 357 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. नायरव्यतिरिक्त संघासाठी या सामन्यात सलामीवीर हसन आझाद याने 48, तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला टॉम टायलर यांने 66 धावांचे योगदान दिले. सरे संघासाठी टॉम लॉज याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच जेमी ओव्हरटन यानेही 3 विकेट्स नावावर केल्या.
दरम्यान, करुण नायर याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिला सामना त्याने भारतासाठी जिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्यात वर्षाच्या शेवटी नायरने एम चिदम्बरम स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद 303 धावांची खेळी केली. भारतासाठी विरेंद्र सेहवाग याच्यानंतर नायर कसोटीत 300 धावांची खेळी करणारा केवळ दुसरा भारतीय आहे. असे असले तरी, नंतर त्याला भारतासाठी खेळण्याच्या जास्त संधी मिळाल्या नाहीत. कसोटीत त्याने 6 सामन्यांमध्ये 62.33च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. (Nair’s blast in the county, he scored a 150 in just his second match)
महत्वाच्या बातम्या –
सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय
रोहित जसा 2019 World Cupमध्ये खेळला, तसा आता ‘हा’ फलंदाज खेळणार; रैनाने 14 दिवसांआधीच केली भविष्यवाणी