पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी नामीबियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी गेरहार्ड इरास्मस करेल. या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण दिसत आहे. मागील वर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या विश्वचषकात केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न हा संघ करताना दिसेल.
🚨 JUST IN: Namibia have announced their squad for the ICC Men's #T20WorldCup 2022.
Details 👇https://t.co/CzC8ZGSoDT
— ICC (@ICC) September 13, 2022
निवडसमितीने निवडलेल्या संघात कर्णधार इरास्मस, जेजे स्मित, स्टीफन बार्ड, जॅन फ्रायलिंक, निकोल लोफ्टी ईटन, रुबेन ट्रम्पेलमन आणि डेव्हिड विसे हे मागील विश्वचषकात चमकलेले खेळाडू सामील आहेत. विसेने यापूर्वी दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, आयपीएलमध्ये तो आरसीबीचा भाग होता. याव्यतिरिक्त संघात काही नवीन नावे आली आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज लोहान लुरेन्स, फलंदाज दिव्हान ला कॉक आणि वेगवान गोलंदाज टांगेनी लुंगामेनी ही तीन नावे संघात आहेत जी प्रथमच या मानाचा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
नामिबियाने 2021 टी20 विश्वचषकात सर्वांनाच प्रभावित केलेले. पात्रता फेरीत श्रीलंका, नेदरलँड्स आणि आयर्लंड या संघाच्या गटातून पुढे येत त्यांनी, स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत स्थान मिळविले होते. यावेळी पहिल्या फेरीच्या अ गटामध्ये नामिबियाला श्रीलंका, नेदरलँड्स आणि युएईसोबत स्थान मिळाले आहे. ते 16 ऑक्टोबर रोजी जिलॉन्गमधील कार्डिनिया पार्क येथे श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील. त्याच मैदानावर त्यांचा सामना 18 ऑक्टोबरला नेदरलँड आणि 20 ऑक्टोबरला यूएईशी होईल.
टी20 विश्वचषकासाठी नामीबिया संघ-
गेरहार्ड इरास्मस, जेजे स्मित, दिवान ला कॉक, स्टीफन बार्ड, निकोल लोफ्टी ईटन, जॅन फ्रायलिंक, डेव्हिड विसे, रुबेन ट्रंपेलमन, झेन ग्रीन, बर्नार्ड शॉल्ट्झ, टांगेनी लुंगामेनी, मायकेल व्हॅन लिंजेन, बेन शिकोंगो, कार्ल बिर्केनस्टॉक , लोहान लुरेन्स, हेलाओ फ्रान्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”