टी20 क्रिकेट म्हणजे नुसता धावांचा पाऊस, असंच समीकरण हल्ली पाहायला मिळते. कधी कधी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनेही सामने संस्मरणीय ठरलेत, पण बहुदा फलंदाजच सामने गाजवताना दिसतात. टी20 हा प्रकार फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे दिसते, यात कमी चेंडूत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूची वाहवा होते. त्यातही टी20मध्ये शतक झळकावणे म्हणजे दिव्यच. परंतू हेही दिव्य आजवर अनेकांनी पार केलंय. परंतू, मंगळवारी (दि. 27) नामिबियाच्या फलंदाजाने आजवरच्या टी20 क्रिकेट इतिहासातील अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत. त्याने धूवांधार फलंदाजी करत सर्वात कमी चेंडूत शतक साकारले आहे.
नामिबियाचा खेळाडू लॉफ्टी-ईटन याने पुरुषांच्या T20I मध्ये कमी चेंडूत शतक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. नामिबियाचा फलंदाज जॅन निकोल लोफ्टी-ईटनने नेपाळविरुद्ध केवळ 33 चेंडूत शतक ठोकले. ज्यामुळे तो सध्या T20I मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा जगातील अव्वल फलंदाज बनला आहे. Loftie-Eaton ने यजमानांविरुद्धच्या नेपाळ तिरंगी T20I मालिकेतील पहिल्या T20I मध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली. 11व्या षटकात त्याने आपला गियर बदलला आणि षटकार चैकारांची आतिषबाजी केली आणि नामिबियाचा धावफलक 200 पार नेला.
त्याने 11 चौकार आणि आठ षटकारांसह केवळ 36 चेंडूत 101 धावा केल्या आणि 33व्या चेंडूत चौकारासह शंभरचा टप्पा गाठला. पुरुषांच्या T20I मध्ये यापूर्वीचे सर्वात जलद शतक नेपाळच्या कुशल मल्लाचे होते, ज्याने गेल्या वर्षी मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत शतक केले होते. पण आता हा रेकॉर्ड नामिबियाच्या लॉफ्टी-ईटन याच्या नावे झाला आहे.
Absolute carnage from Jan Nicol Loftie-Eaton 💥#NEPvNAM | 🔗: https://t.co/VGIUhyjzaA pic.twitter.com/AWtb9zKkuS
— ICC (@ICC) February 27, 2024
🚨 Record Alert 🚨
Namibia’s Jan Nicole Loftie-Eaton hits the fastest-ever Men’s T20I hundred 🎇#NEPvNAMhttps://t.co/8I3D13kh6I
— ICC (@ICC) February 27, 2024
अधिक वाचा –
– पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला, दिग्गज क्रिकेटरचा कारकिर्दीला टाटा-बायबाय
– IND vs ENG : भारतीय संघाने इंग्लंडला हरवून भारतीय भूमीवर साकारला सलग 17वा कसोटी मालिका विजय
– IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,”युवा…