पुणे, 17 मार्च 2024: शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे आयोजित शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत नमिश हुड, यशवंतराजे पवार, लक्ष्य त्रिपाठी, अधिराज दुधाने आदिराज ब्रम्हनाथकर, लव परदेशी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित नमिश हुडने सोळाव्या मानांकित शौर्य गडदेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. बिगरमानांकित शौर्य बोराडेने चौथ्या मानांकित शुभ नाहाटाचा 5-7, 6-3, 10-7 असा तर, लक्ष्य त्रिपाठीने पाचव्या मानांकित रुद्र पटवर्धनचा 6-3, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. अधिराज दुधानेने नवव्या मानांकित अभिनव शर्माचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला.
सोलापूरच्या यशवंतराजे पवारने आदित्य वाडकर वर 5-7, 6-3, 10-7 असा विजय मिळवला. आदिराज ब्रम्हनाथकर याने अभिर सिद्धूला 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
नमिश हुड(1)वि.वि.शौर्य गडदे(16) 6-1, 6-2;
यशवंतराजे पवार वि.वि.आदित्य वाडकर 5-7, 6-3, 10-7;
आदिराज ब्रम्हनाथकर वि.वि.अभिर सिद्धू 6-4, 6-1;
शौर्य बोराडे वि.वि. शुभ नाहाटा(4) 5-7, 6-3, 10-7;
लक्ष्य त्रिपाठी वि.वि.रुद्र पटवर्धन(5) 6-3, 6-0;
अधिराज दुधानेवि.वि.अभिनव शर्मा (9)6-1, 6-0.