सलग दोन पराभव झालेल्या नाशिक द्वारका डिफेंडर्स समोर आज आव्हान होता नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाचा. नांदेड च्या अक्षय सूर्यवंशी व अजित चव्हाणच्या आक्रमक खेळाने नाशिक संघावर लोन पडत आघाडी मिळवली. नाशिक मधून ऋषिकेश गडाख ने अष्टपैलू खेळ करत तर भूषण सानप ने सुपर टॅकल करत संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
मध्यंतराला 20-13 अशी नांदेड संघाकडे होती. त्यानंतर 3 मिनिट मध्ये आणखी एक लोन नाशिक संघावर पाडला. नांदेडच्या अक्षय सूर्यवंशी व अजित चव्हाण यांच्या सुपर टेन ने सामना एकतर्फी केला. नाशिक च्या ऋषिकेश गडाख ने सुपर टेन करत एकाकी झुंज दिली मात्र नांदेड संघाने 41-38 असा विजय मिळवला.
नांदेड कडून अक्षय सूर्यवंशी ने चढाईत 15 तर अजित चव्हाण ने 10 गुण मिळवले. तर सुरज पाटील, ऋषिकेश भोजने व मोसीन पठाण ने प्रत्येकी 3 पकडी केल्या. नाशिक संघाच्या ऋषिकेश गडाख ने 16 गुण तर शिवकुमार बोरगोडे ने 10 गुण मिळवत चांगली टक्कर दिली. (Nanded Chambal Challengers beat Nashik in a tight match)
बेस्ट रेडर- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स- सूरज पाटील, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
दिल्लीने शून्यावर गमावल्या दोन विकेट्स, पहिल्या षटकात ट्रेंट बोल्ड पुन्हा विरोधकांवर भारी