धुळे चोला वीरांस विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यात आजचा शेवटचा सामना झाला. नांदेड संघ बलाढ्य होता. तर त्यांच्या समोर धुळे संघ कमजोर दिसत होता. नांदेड संघाचा चढाईपटू अजित चव्हाण ने आक्रमक सुरूवात केली.
मध्यांतरा पर्यत नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने 32-08 अशी मजबूत आघाडी घेतली होती. अजित चव्हाण च्या चतुरस्त्र चढाया पूढे धुळे संघाने अक्षरशः शरणागती पत्करली. अजित चव्हाण ने मध्यांतराला सुपर टेन पूर्ण करत जोरदार खेळ केला.
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने एकतर्फी धुळे चोला वीरांस संघाचा धुव्वा उडवला. 67-18 असा विजय मिळवत नांदेड संघाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. अजित चव्हाण ने चढाईत 33 गुण मिळवत आज केलेल्या आकाश शिंदेचा चढाईतील 32 गुणांचा विक्रम मोडीत काढला. प्रणय चांदेरे ने 5 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. तर ऋषिकेश भोजनेने 4 पकडी केल्या.
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स- प्रणय चांदेरे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवा कबड्डी सिरीजमध्ये आकाश शिंदेचं जोरदार आगमन
अटीतटीच्या लढतीत परभणी पांचाला प्राईड कडून मुंबई शहरचा पराभव