नंदुरबार हिमालयन ताहर्स विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात महत्वपूर्ण लढत झाली. दोन्ही संघाच्या साठी अत्यंत महत्वाची लढत होती. नंदुरबार संघासाठी करो या मरो असच आव्हान होता. सामन्याची सुरुवात दोन्ही संघानी सावध केली. पहिल्या 10 मिनिटात 5-5 असा बरोबरीत सामना सुरू होता.
नंदुरबार संघाने परभणी संघावर लोन पाडत आघाडी मिळवली. नंदुरबार संघाकडून अष्टपैलू खेळ बघायला मिळत होता. चढाईपटू व पकडपटू सारखीच कामगिरी बजावत होते. मध्यंतराला 16-10 अशी आघाडी नंदुरबार संघाकडे होती. तेजस काळभोर चढाईत तर श्रेयस उंबरदंड पकडीत उत्कृष्ट खेळ करत होता.
मध्यांतरा नंतर आणखी एक लोन परभणी वर पाडत नंदुरबार संघाने आपली आघाडी वाढवली. तेजस काळभोर ने सुपर टेन पूर्ण करत संघाच्या आशा वाढवल्या. नंदुरबार संघाने 32-24 असा विजय मिळवत आपल्या आशा कायम ठेवल्या. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने चढाईत 12 गुण मिळवले. तर श्रेयस उमरदंड ने 5 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. तर परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष ने 13 गुण मिळवत एकाकी झुंज दिली. (Nandurbar Himalayan Tahrs beat Parbhani Panchala Pride)
बेस्ट रेडर- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स
बेस्ट डिफेंडर्स- श्रेयस उमरदंड, नंदुरबार हिमालयन ताहर्स
कबड्डी का कमाल- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
नांदेड चांबल चॅलेंजर्स, ठाणे हम्पी हिरोज संघाचा सलग चौथा चौकार