---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली वैभव सूर्यवंशीची भेट, पुढील भविष्यासाठी दिल्या खास शुभेच्छा!

On: शुक्रवार, मे 30, 2025 4:16 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे (vaibhav suryavanshi) सगळीकडेच कौतुक होत आहे. वैभवने खूप रेकॉर्ड त्याच्या नावावर केले. स्पर्धेदरम्यान वैभवने शानदार शतकी पारी देखील खेळली, तसेच वेगवान शतक झळकवणारा भारतीय खेळाडू सुद्धा तो ठरला. आता वैभव सूर्यवंशीने पूर्ण जगामध्ये त्याची ओळख निर्माण केली आहे. (30 मे) रोजी वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister of India narendra modi meets vaibhav suryavanshi in patana Airport) यांची खास भेट पटना एअरपोर्टवर झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशी (vaibhav suryavanshi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट पटना दौऱ्यावर झाली, जेव्हा नरेंद्र मोदी पटना दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान मोदी यांनी वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांनी प्रथम वैभव आणि त्याच्या वडिलांच्या हातात हात मिळवला. यादरम्यान वैभवच्या आई-वडिलांनी देखील मोदी यांना नमस्कार केला. वैभव आणि त्याच्या परिवाराने काही वेळा पर्यंत मोदी यांच्याशी चर्चा केली. ही भेट पटनाच्या एअरपोर्टवर झालेली आहे.

वैभव भेटल्यानंतर मोदी आनंदी दिसत होते. त्यांनी त्यांच्या एक्सवर देखील या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, पटना एअरपोर्टवर युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या आई-वडिलांची भेट झाली. त्याच्या क्रिकेट कौशल्यांचे पूर्ण देशांमध्ये कौतुक होत आहे.‌ त्याच्या भविष्यासाठी माझ्या त्याला खूप शुभेच्छा.

वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 मध्ये 7 सामन्यात भाग घेतला, पण या सामन्यात त्याने कायम आठवणीत राहतील अशीच खेळी केली. त्याने 36 च्या शानदार सरासरीने 252 धावा केल्या. हंगामात त्याने 18 चौकार आणि 24 षटकार स्वतःच्या नावावर केल्या. गुजरात विरुद्ध वैभवने 38 चेंडू 101 धावांची शतकी खेळी केली. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने शतक झळकावणारा वैभव खेळाडू ठरला. त्याचबरोबर सर्वात कमी वयामध्ये वेगाने शतक झळकावणारा देखील तो खेळाडू ठरला. वैभवला इंग्लंड दौऱ्यासाठी (IND vs ENG) अंडर 19 (under 19) भारतीय संघात निवडण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---