साऊथ-आफ्रिकेचा प्रसिद्ध क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सच्या मुलीचा आज वाढदिवस. ‘इंडिया’ असे तिचे नाव ठेवण्यात आले कारण तिचा जन्म भारतातला आणि जॉन्टीला भारताविषयी असलेली आत्मीयता. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १०व्या मोसामामुळे तो सध्या भारतात आहे.
Happy Birthday baby India; 2 today #landofyourbirth pic.twitter.com/RGVxmXRjRv
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) April 23, 2017
आज इंडियाच्या दुसऱ्या वाढदिवसानिम्मित अनेक लोकांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. या सर्वांमध्ये जॉन्टी भारावून गेला ते एका व्यक्तीच्या शुभेच्छांमुळे, ते म्हणजे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छांमुळे. पहा काय म्हणाले नरेंद्र मोदी..!!
Happy birthday to India, from India. 🙂 https://t.co/DbOZFEKLe9
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2017