एशिया कप (Asia Cup) 2022च्या हंगामात भारतीय संघाची सुरूवात जबरदस्त झाली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. याबरोबरच भारताने मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकामध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. हा सामना चांगलाच थरारक झाला आहे. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात विजयाचे माप कधी भारताकडे तर कधी पाकिस्तानकडे झुकत होते. या सामन्यांत फलंदाजांची नाहीतर गोलंदाजांची अवस्था वाईट झाली होती.
फिटनेस किंवा स्थिती नाहीतर हे कारण आहे पाकिस्तानच्या पराभवामागे
दुबईचे वातावरण सध्या गरम आहे. यामुळे सामन्यात खेळाडूंच्या फिटनेस आणि वातावरणाने नाही तर दबावामुळे खेळाडूंची स्थिती वाईट झाली होती. या सामन्यात नसीमच नाही तर हॅरिस रऊफ हा पण गोलंदाजीवेळी संघर्ष करताना दिसला.
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) हा सामना नेहमीच दबावात्मक होत असतो आणि हा सामना तोच संघ जिंकतो जो त्या दबावाला पेलू शकतो. हार्दिक पांड्या हे त्याचे उदाहरण आहे. त्याने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. यादरम्यान भारताने एक विकेटही गमावली. निर्धाव चेंडू टाकले गेले. अशा स्थितीत हार्दिकने शांत राहत एमएस धोनीच्या स्टाईलने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला आहे. यावरून त्याने तो दबाव झेलला आणि विजयाचा नायक ठरला.
हा सामना जेव्हा सुरू होता तेव्हा स्टार स्पोर्ट्सवर वसीम अक्रम (Wasim Akram) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनीही चर्चा केली आहे. त्यांनी दबावाच्या स्थितीत खेळाडूंनी कशाप्रकारे कामगिरी केली याबाबत उल्लेख केला. पठाण याने 2007मध्ये खेळलेल्या टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्याबाबत सांगितले आहे. त्याने म्हटले, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने हाई वोल्टेजचेच असतात. मी त्या सामन्यात 4 षटकेच टाकली होती. मात्र मी फार दमलेला होता. त्याचे कारण फिटनेस किंवा स्थिती नाही, तर आम्ही अनेक सामने खेळल्यावर अंतिम सामन्यात पोहोचलो होतो. त्याच दबानामुळे मी 24 चेंडू टाकूनच दमलेलो होतो.
वसीम अक्रम यांनी म्हटले, 1992 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळताना मी 33 धावा केल्या होत्या, मात्र जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा पहिलाच चेंडू टाकून दमलो होतो. तर फलंदाजी करताना 18 चेंडू खेळलो होतो.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही नसीमचे कारण स्पष्ट करताना फिटनेसबाबत काही चिंता नाही, असे मत व्यक्त केले होते. यावरून त्याच्या दृष्टीनेही पाकिस्तानच्या खेळाडूंवर सामन्याचा सर्वाधिक दबाव होता हे मान्य केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
तयार रहा! रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक थरार? अशी आहेत समीकरणे
हार्दिकच्या ‘कडक’ कामगिरीनंतर आनंदला माजी भारतीय क्रिकेटर; ट्विट करत म्हणाला…