भारतीय तलवारबाजी महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि कै.कोंडाजी नादेव दुधारे बहुउदेशिया मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक च्या पुण्यनगरीत ५ व्या युवा राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि. २९ ते ३१ मार्च २०१८ च्या दरम्यान संत जनार्धन स्वामी मठ, औरंगाबाद रोड, तपोवन,पंचवटी नाशिक येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेला अंदाजे १४ लाख ६० हजार एवढा खर्च येणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारतातील खालील राज्य सहभागी होणार आहेत.
१) आंध्रप्रदेश २)जम्मू-काश्मीर ३) हिमाचल प्रदेश ४) चंडीगड ५) पंजाब ६) हरियाणा ७)दिल्ली ८)उत्तर प्रदेश ९)छत्तीसगड १०)झारखंड ११) बिहार १२)मध्य प्रदेश १३)गोवा १५)गुजरात १६)दिव-दमण १७) दादरा-नगर हवेली १८) कर्नाटका १९) ओरिसा २०) केरळ २१) तामिळनाडू २२) तेलंगाना २३) पं. बंगाल २४) आसाम २५) मणिपूर २६) मेघालय २७) मिझोराम २८) पॉन्डेचेरी २९) सेनादल३०) नेव्ही आणि ३१) महाराष्ट्र
या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार असून निवड झालेले संघ दि. १३ऑक्टो ते १८ ऑक्टो,२०१८ दरम्यान मनिला, फिलिपिन्स येथे होण्याऱ्या आशियाची स्पर्धेत सहभागी होईल.
स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सहभाग
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे थोबासिंग, अक्षय देशमुख, तुषार आहेर, रोशनी मुर्तडक, स्नेहल पवार(सर्व महाराष्ट्र) ध्रुव वालिया, सिमरन कौर, भुषण प्रीत, हरप्रीत कौर,हरविंदर सिंग,(सर्व पंजाब) ज्योतिका दत्ता,(हिमाचल प्रदेश), करण गुजर, जेटली, शिवा महेश(सर्व आर्मी) बिन्दू कुमारी,सर्जीन(मणिपूर) हे सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत महिला व पुरुष या दोन्ही गटाच्या इपी, फाँईल आणि सँबर याप्रकारच्या वैयक्तिक स्पर्धा होणार आहेत, तसेच, त्यानंतर सांघिक प्रकारातही अश्याच प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेचा उदघाटन प्रसंगी तलवारबाजीतील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिवछत्रपती मार्गदर्शक राजू शिंदे (नाशिक), शिवछत्रपती संघटक राजकुमार सोमवंशी ( उस्मानाबाद), विलास वाघ ( ठाणे), डॉ. प्रदीप तळवेलकर(जळगाव), दत्ता गलाले ( लातूर), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अस्मिता दुधारे( नाशिक), स्वप्नील तांगडे(औरंगाबाद), शरयू पाटील(नाशिक), स्नेहल पवार(ठाणे), सागर मगरे(औरंगाबाद), यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी दत्ता पाटील, राजू शिंदे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, दिपक निकम, मनिषा काटे, राजू जाधव, पांडुरंग गुरव , मधुकर देशमुख, कुणाल अहिरे, विक्रम दुधारे, राहुल फडोळ, इ, प्रयंत्नशिल आहेत
या स्पर्धेसाठी ७ अद्ययावत मैदाने तयार करण्यात आले आहेत. सर्व स्पर्धा स्पर्धा इलेक्ट्रॉनिक अँपरेटसवर खेळविल्या जाणार आहेत.
स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंचप्रमुख ले.कर्नल, विक्रम जमवाल(आर्मी), भुषण जाधव(महाराष्ट्र), लोहित कुमार(कर्नाटका) यांचा मार्गदर्शनाखाली भारतातील विविध राज्यांचे एकून ४० पंच या स्पर्धासाठी काम करणार आहेत.
स्पर्धेचा दरम्यान भारतीय तलवारबाजी महासंघाचे सरचिटणीस बशीर खान(छत्तीसगड), उपाध्यक्ष अनघा वार्लीकर(गोवा) सहसचिव गुरमोहन सिंग(मध्य प्रदेश), कार्यकारणी सदस्य मुरली किशन ( अन्द्रप्रदेश ) , हीना शुक्ला ( दिव दमन ), भरत ठाकूर (गुजरात), संजय प्रधान( उत्तर प्रदेश) इ. पदाधीकारी उपस्तीत राहणार आहेत.
पुरुष खेळाडूची निवास व्यवस्था संत जनार्धन स्वामी आश्रम औरंगाबाद रोड, तपोवन, पंचवटी नाशिक येथे करण्यात आली आहे तर महिला खेळाडूंची व्यवस्था कैलास मठ, पेठ नाका, पंचवटी नाशिक येथे करण्यात आली आहे.पंचांची निवास व्यवस्था राही हॉटेल, पेठ नाका, पंचवटी, नाशिक, रामा पँलेस,काळाराम मंदिर, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आली आहे. पदाधीकारी यांची निवास व्यवस्था साई प्रेम हॉटेल, तपोवन, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आली आहे.
खेळाडूंची रेल्वे स्टेशन ते निवास व्यवस्था यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिलां खेळाडूंची निवास व्यवस्था ते स्पर्धा स्थळ ने आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेचा कार्यक्रम
स्पर्धा दिनांक – २९ ते ३१ मार्च, २०१८
उदघाटन समारंभ – दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता स्पर्धा स्थळी (कार्यक्रम पत्रिका जोडलेली आहे)
स्पर्धाची वेळ – सकाळी ०८.३० ते ११.०० दुपारी ०४.०० टी रात्री ०८.०० वाजेपर्यंत.
.