ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी नुकताच खुलासा केला की, त्यांना पर्किंसनचा आजार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर इंग्लंडचे माजी कर्णदार नासिर हुसेन निराश झाले आहेत. नासिर हुसेन आणि ऍलन बोर्डर यायंनी एकत्र क्रिकेट खेळले असून त्यांच्या अनेक अठवणी आहेत. नासिर यायंनी बॉर्डरच्या याच आठवणींना उजाळा दिला.
ऍॅलन बॉर्डर (Allan Border) यांनी खुलासा केला की, त्यांना पर्किंसन नावाचा आजार आहे. या आजारात रुग्णाच्या हात-पायापासून डोक्यापर्यंत जाणाऱ्या नसा काम करणे बंद करतात. त्यांनी सांगितल्यानुसार या आजारपणात ते 80 जगले, तर हा चमत्कार असेल. 68 वर्षीय बॉर्डर यांनी सांगितले की 2016 मध्येच त्यांना हा आजार झाला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी कुणालाच याविषीय सांगितले नव्हते. ऍलन बॉर्डर यांच्या आराजी माहिती मिळाल्यानंतर माजी इंग्लिश दिग्गज ऍलन बॉर्डर यांनीही नाराजी व्यक्त केली. सुहेन यांच्यासाठी हा धक्का असून त्यांनी दुःख व्यक्त केले.
नासिर हुसेन (Nasir Hussain) म्हणाले, “ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ऍलन बॉर्डर यांनी शुक्रवारी सार्वजनिक रित्या सांगितले की, ते पर्किंसन आजाराशी झुंज देत आहेत. ही खूपच दुःखद बाब आहे. मी ऍळन बॉर्डरसोबत ऍसेक्स संघात खूप खेळलो आहे. तीन ऍशेस कसोटी सामनेही त्याच्याविरोधात खेळलो आहे. जागतिक क्रिकेटमधील ते एक चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान समजून घ्यायला त्यांच्यापेक्षा कठीण व्यक्तिमत्व दुसरे कोणतेच नव्हते. पण त्यांच्यासोबत जेव्हा ड्रेसिंग रूम शेअर कराल, तेव्हा या गोष्टी पाहायला मिळत नव्हत्या. ते खूपच शानदार व्यक्ती होते.”
ऍलन बॉर्डर यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी 156 कसोटी, आणि 273 वनडे धावा केल्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 11174 धावा केल्या असून, वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावापुढे 6524 धावांची नोंद आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर गावसकर ट्रॉफी देखील ऍलन बॉर्डर आणि सुनील गवासकर या दिग्गजांच्या नावने खेळली जाते. (Nasir Hussain emotional after learning about Alan Border’s illness)
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय
व्हिडिओ: रोहित-रितिकाकडून लेक समायराला मिळाले आयुष्यभर लक्षात राहील असे सरप्राईज, लंडनमध्ये…