---Advertisement---

पाच बॉल खेळून नसीम शाह ठरला हिरो! सलग दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा रोमहर्षक विजय

Naseem Shah
---Advertisement---

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रोमांचक ठरला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर नसीम शाह याने चौकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने एक चेंडू आणि एक विकेट शिल्लक ठेवून सामना नावावर केला. या विजयासह पाकिस्तानने मालिका देखील नावावर केली.

उभय संघांतील या सामन्यात दोन्ही सघांच्या फलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत 300 धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 50 षटकात 5 बाद 300 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 49.5 षटकात 9 बाद 302 धावा केल्या. पाकिस्तानला मिळालेल्या 301 धावांपेक्षा एक धाव संघाने जास्त केली. विशेष म्हणजे पाकिस्तानकडे यावेळी एक विकेट आणि एकच चेंडू शिल्लक होता.

अफगाणिस्तानसाठी रहमनुल्ल्हा गुरबाझ याने 151 चेंडूत 151 धावा केल्या. त्याचसोबत सलामीवीर इब्राहिम झद्रान याने 101 चेंडूत 80 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघासाठी सलामीवीर इमाम-उल-हक याने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार बाबर आझम 66 चेंडूत 53 धावांची खेली केली. शेवटची काही षटके प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. 48 व्या षटकात शाहीन आफ्रिदी नॉन स्ट्राईक एंडला धावबाद झाल्यानंतर मैदानातचांगलाच गौंधळ उडाला होता. सामना पाकिस्तानच्या हातून निसटताना दिसत होता. मात्र, शेवटच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांनी संयमी खेळी करत आवश्यक धावा केल्या आणि विजय मिळवला.

गोलंदाजांच्या प्रदर्शनावर एक नजर टाकली, तर पाकिस्तानसाठी शाहीन शाह आफ्रिदी याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. नसीम शाह आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकी याला तीन विकेट मिळाल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोहम्मद नवी याने दोन, तर मुजीब उर रहमान आणि अब्दुल रहीम यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.  (NASSEM IS THE HERO…!!! Pakistan beat Afghanistan by just 1 wicket)

महत्वाच्या बातम्या –
राशिद खानचा यू टर्न! देशासाठी ‘या’ लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय बदलला
FIDE Chess World Cup । भारताच्या युवा बुद्धिबळपटूचे स्वप्न तुटले, मॅग्नस कार्लसनकडून पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---