जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामनाच्या पहिला डाव भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. कागदावर बलाढ्य वाटणारी फलंदाजी या डावात अवघ्या २१७ धावा करू शकली. भारताचे सगळेच फलंदाज या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यात युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा देखील समावेश होता.
पंत या डावात अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. मात्र तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यानंतर सर्वांनीच त्याच्या चुकीच्या फटक्यावर टिका केली. परंतु इंग्लंडचे माजी खेळाडू आणि सामन्याचे समालोचक नासिर हुसैन यांनी पंतची बाजू घेतली आहे.
हुसैन यांनी स्पष्टीकरण दिले की, “पंतच्या या खेळीबद्दल चर्चा करण्याची आता योग्य वेळ नाही. पंतने अंतिम सामन्यात केवळ ४ धावा केल्या आणि तो बाद झाला. जेमिनसनने टाकलेल्या चेंडूवर त्याने स्लिपकडे फटका मारला आणि तो झेलबाद झाला. आता भारतीय व्यवस्थापन मंडळ पंतला कसे सांभाळून घेतात हे मुख्य असणार आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली, पंतला सांभाळून घेण्यासाठी चांगले व्यक्ती आहेत. तो जसा खेळतोय त्याला खेळू द्या.”
हुसैन यांनी पुढे सांगितले की, “पंतने जो फटका मारण्याचा प्रयत्न केला, तो फटका इंग्लंडच्या खेळपट्टीवर खतरनाक फटका आहे. परंतु, तुम्ही त्याला विचारू शकत नाही की, तू हा फटका का मारलास? तुम्ही फक्त त्या गोष्टीला विसरून त्याला त्याचा नैसर्गिक खेळ चालू ठेवण्याचा सल्ला देऊ शकता. त्याने या सामन्याचा अगोदर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तुम्हाला जिंकवून दिले आहे. त्याची एक–दोन खेळी खराब गेल्यामुळे त्याला बोलणे योग्य नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या सुपरमॅन क्षेत्ररक्षणाची विलियम्सनने केली नक्कल; स्वत: ऑसी फलंदाजाने फोटो केला शेअर
विकेट मिळेना म्हणून विराट-शुबमनने अवलंबला स्लेजिंगचा मार्ग, किंवी फलंदाजांना ‘असं’ उकसावलं
कोहलीला तंबूत धाडणाऱ्या जेमिसनने गायले त्याचे खूप गुणगान, पाहा काय म्हणाला