---Advertisement---

“…म्हणून भारताविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला”, माजी दिग्गज कर्णधारानं स्पष्टच सांगितलं

Nasser Hussain
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघानं विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत अशा अनेक बड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं सलग चार सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं. भारताविरुद्ध इंग्लंडच्या पराभवानंतर माजी इंग्लिश कर्णधार नासिर हुसैन चांगलाच संतापला आहे.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला या संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. यावरून नासिर हुसैन भडकला आहे. “बेन स्टोक्सची बॅट संपूर्ण मालिकेत चालली नाही. याचं कारण तो निव्वळ फलंदाज म्हणून खेळत होता हेही असू शकतं. त्यानं केवळ त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि त्यात सुधारणा करायली हवी”, असं नासिर हुसैन म्हणाला.

हुसैन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि 500 ​​हून अधिक बळी घेणारा भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांचं कौतुक केलं. हुसैन म्हणाला, “बॅझबॉलबद्दल बरंच काही सांगितलं आणि लिहिलं गेलं आहे. या परिस्थितीत वैयक्तिक कामगिरीही महत्त्वाची असते, असं मी आधी म्हटलं होतं. या सामन्यात जिमी अँडरसन आणि रविचंद्रन अश्विन हे दोन खेळाडू खेळत होते. तो या खेळाचे उत्कृष्ट खेळाडू बनले कारण त्यांनी सतत आपला खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी आपला गेम सुधारण्याचा प्रयत्न केला.”

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव झाला होता. मात्र टीम इंडियानं त्यानंतर पुढील चार कसोटी सामने जिंकून मालिका 4-1 अशी खिशात घातली. या मालिका विजयासह भारतीय संघानं आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे. ही मालिका भारतीय युवा खेळाडूंच्या नावे राहिली. मालिकेत भारताकडून तब्बल 5 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं. हा एक रेकॉर्ड आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ICC रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा कायम, तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1

टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!

इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---