ऑस्ट्रेलियात पुरूष क्रिकेट संघाचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup)खेळला गेला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (14 नोव्हेंबर) पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंड 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडच्या या विजयामध्ये माजी कर्णधार ओएन माॅर्गन याचे खूप मोठे योगदान असल्याचे म्हटले जात आहे. ते कशाप्रकारे हे जाणून घेऊ.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू नासीर हुसेन (Nasser Hussain) यांनी एक विधान केले, ज्यामध्ये त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन माॅर्गन (Eoin Morgan) यांचा उल्लेख केला. त्याने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मॉर्गनचे योगदान रोहितपेक्षा मोठे होते, असे म्हटले.
हुसेन म्हणाले, ” या विश्वचषकात ओएन मॉर्गनचे योगदान रोहित शर्मापेक्षा मोठे होते. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे इंग्लंडला या विश्वचषकात उत्तम कामगिरी करत संघाची साथ देऊ शकतील अशा 11 खेळाडूंना खेळवता आले.”
हुसेन यांंच्या या विधानाचा काहींनी वेगळाच अर्थ काढला असून काहींनी त्याने बरोबरच म्हटले असे म्हणाले आहेत.
मॉर्गनने वयाच्या 16व्या वर्षी आयर्लंडकडून 2006मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो 2009मध्ये इंग्लंडच्या संघात आला. त्याने 2019मध्ये वनडे विश्वचषकात नेतृत्व करताना संघाला पहिला विश्वचषक मिळवून दिला.
मॉर्गनने इग्लंडकडून 248 वनडे आणि 115 टी20 सामन्यांमध्ये एकूण 10159 धावा केल्या. त्याने 126 वनडे आणि 72 टी20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यातील दोन्ही प्रकार मिळून 118 सामन्यांमध्ये संघ विजयी ठरला. हा एक प्रकारचा विक्रमच ठरला. तसेच त्याने 16 कसोटी सामन्यांत 700 धावा केल्या.
दुसरीकडे रोहितने भारताच्या नियमित कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना एक वर्ष पूर्ण केले. या एका वर्षात त्याने भारताला अनेक टी20 सामने आणि मालिका जिंकून दिल्या. त्याच्याआधी विराट कोहली याच्याकडे भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी होती, मात्र मागील वर्षी संघ टी20 विश्वचषकातून बाहेर झाल्याने त्याच्यावर टीका झाल्या. यामुळे त्याने कर्णधारपदाचा त्याग केला आणि रोहितला नवा कर्णधार करण्यात आले. तसेच त्याने अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भुषविले आहे. त्यामुळे पुढचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरले अशी अपेक्षा सर्वांना होती. Nasser Hussain said, Eoin Morgan’s contribution in this world cup was greater than Rohit Sharma
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानला अचानक गाठावा लागला दवाखाना, ‘हा’ आजार मोठ्या काळापासून सोडत नाहीये पाठ
आयपीएल 2023 पूर्वी दिल्लीने खेळला मोठा डाव, ‘या’ मॅचविनर खेळाडूला धाडले कोलकाताच्या गोटात