---Advertisement---

‘बायो बबलमध्ये वेळ घालवत नाही, तोपर्यंत दुसऱ्यांना व्याख्यान देऊ नका’, माजी इंग्लिश कर्णधाराने पेनला फटकारले

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 12:35 AM
---Advertisement---

इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेपूर्वी दरवेळी प्रमाणे वाकयुद्धास सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, टिम पेनला इंग्लंडच्या खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही.

हुसेन म्हणाला की, जो रूटच्या संघाचा मला अभिमान आहे, कारण त्यांनी स्वतः चे मनोबल उंचावले आणि कसोटीतील बांधिलकीचा सन्मान केला आहे. आपल्या स्तंभात हुसेन म्हणाला, ‘सध्या असे दिसत आहे की, इंग्लंडच्या कसोटी खेळाडूंनी ऍशेस मालिके दरम्यान क्वारंटीनच्या नियमांबद्दल आपले मत स्पष्ट केल्यानंतर खेळाडूंवर विशेषतः ऑस्ट्रेलियाकडून बरीच टीका होत आहे.’

मार्च २०२० मध्ये महामारीच्या प्रारंभापासून इंग्लंडने १८ कसोटी सामने खेळले आहेत. हे इतर कोणत्याही संघापेक्षा पाच सामने ते अधिक खेळले आहेत, तर ऑस्ट्रेलियापेक्षा १४ सामने अधिक आहे.

तो म्हणाला, ‘इंग्लंड कसोटी संघाने ज्याप्रकारे कठीण परिस्थितीतून स्वत: ला पुढे नेले आणि आपल्या कुटुंबापासून दूर वेळ घालवला त्याचा मला खूप अभिमान आहे. यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे.’

हुसेन म्हणाला की, ऑस्ट्रेलियामधील लोक इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना व्याख्याने देत आहेत आणि त्यांना ऍशेस मालिकेदरम्यान क्वारंटाईन प्रोटोकॉल स्वीकारण्यास सांगत आहेत.

हुसेन पुढे म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना व्याख्याने देणे सुरू केले आहे आणि त्यांना ते नियम मान्य करण्यास सांगत आहेत. जेव्हा ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पेन अलीकडे बोलला, तेव्हा मला त्याच्या बोलण्यामध्ये कोणतीही सहानुभूती दिसली नाही.’

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पेनने अलीकडेच इंग्लंडच्या क्रिकेटपटूंवर टिप्पणी करताना म्हटले होते की, कोणीही त्यांना !!ऍशेसमध्ये खेळण्यास भाग पाडत नाही. हुसेन म्हणाला, ‘ व्यावसायिक क्रिकेटपटूसाठी घरापासून दूर असतानाही ऍशेससारख्या मालिकेत देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये सहभागी होऊन स्वतःवरील अतिरिक्त भार वाढवला आहे. मी समजू शकतो, पण जोपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा वेळ बायो बबलमध्ये घालवत नाही, तोपर्यंत इतरांना कसे वागावे याचे व्याख्यान देऊ नका.’

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मला कधीच जाणवले नाही, की केएल राहुल एक चांगला लीडर आहे’, जडेजाने केले मोठे व्यक्तव्य

मॉर्गन सोबत झालेल्या वादावर अश्विनने केले वक्तव्य; म्हणाला, ‘या सर्व गोष्टींनी मला…’

किती क्यूट!! ऋतुराज गायकवाड करतोय रैनाच्या दीडवर्षीय मुलाबरोबर मस्ती, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---