भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायनसाठी देखील तितकाच विशेष असणार आहे. लायनचा हा कसोटी कारकिर्दीतील शंभरावा सामना आहे.
लायनने आपले कसोटी पदार्पण 2011 साली श्रीलंका विरुद्ध केले होते. लायनची विशेषता म्हणजे तो पहिल्या सामन्यापासून नियमितपणे उत्तम गोलंदाजी करत आहे. लायनने आतापर्यंत खेळलेल्या 99 कसोटी सामन्यात 31.98 च्या सरासरीने 396 विकेट घेतलेल्या आहेत. यात 50 धावा देत 8 बळी ही लायनची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. लायन ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक बळी मिळवणारा ऑफ स्पिनर देखील आहे. आयसीसीच्या वर्तमान कसोटी क्रमवारीत लायन पंधराव्या स्थानावर आहे.
आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात लायनकडून संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. विशेष म्हणजे लायनला आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात 400 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करण्याची संधी आहे.
https://twitter.com/ICC/status/1349850407955173378
असाही एक विक्रम –
ज्या क्रिकेटपटूंना कसोटी पदार्पणावेळी सर्वात कमी प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव होता, पण तरी ते त्यांच्या कारकिर्दीत 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची त्यांना संधी मिळाली अशा क्रिकेटपटूंच्या यादीत आता नॅथन लायनचे नाव आले आहे. तो 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या पण पदार्पणावेळी सर्वात कमी प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर डॅनिएल विट्टोरी असून त्याने कारकिर्दीत ११३ कसोटी सामने खेळले पण त्याच्या पदार्पणावेळी त्याने केवळ २ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वासिम आक्रम असून त्यांनी पदार्पणाआधी केवळ 3 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. पण कारकिर्दीत त्यांनी पुढे 104 कसोटी सामने खेळले. तर आता या पाठोपाठ नॅथन लायन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने त्याच्या कसोटी पदार्पणाआधी केवळ 5 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. चौथ्या क्रमांकावर क्लाईव्ह लॉईड आणि शेन वॉर्न आहेत. या दोघांनीही त्यांच्या पदार्पणावेळी 7 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. पुढे त्यांनी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS vs IND : ब्रिस्बेन कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; ‘या’ दोन खेळाडूंचे झाले पदार्पण
मोहम्मद आमिरचे निवृत्तीच्या निर्णयावरून घूमजाव, म्हणाला…